कळसच : कोरोना बाधित रुग्णास आणावयास गेलेल्या पथकासह पोलिसांनवर केली दगडफेक....

राजेंद्र बाईत
Wednesday, 22 July 2020

नाटे येथे आज नवीन कोरोना पोजीटीव्ह रुग्ण सापडला मात्र,

राजापूर  (रत्नागिरी) : तालुक्यातील नाटे येथे आज नवीन कोरोना पोजीटीव्ह रुग्ण सापडला आहे. मात्र, त्या रुग्णाला नेण्यास गेलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यासह पोलिसांना तेथील ग्रामस्थांनी विरोध करीत त्यांच्यावर दगडफेक केल्याची घटना आज सकाळी घडली. त्यामुळे त्या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेनंतर संतप्त झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकांचे आरोग्य सांभाळणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर अशी दगडफेक होत असेल तर आम्ही काम कसे करायचे ? असा सवाल उपस्थित करत भविषयात काम बंद आंदोलन छेडन्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा- रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या २० दिवसांत दुप्पट... -
दोन दिवसांपूर्वी नाटे येथे दोन कोरोना पोजेटीव्ह रुग्ण सापडले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर आज आणखीन एक नवीन रुग्ण सापडला आहे. या रुग्णाला नेण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी गेले होते. त्या रुग्णाला तेथून नेण्याला स्थानिक ग्रामसस्थानी विरोध केला. त्यानंतर बाचाबाची झाली असता पोलिसही त्याठिकाणी दाखल झाले.  

हेही वाचा- रत्नागिरीमध्ये शहर पोलिस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव... -

मात्र, त्यानंतरही ग्रामस्थांनी त्याला विरोध करत कर्मचाऱ्यांसह गाड्यांवर दगडफेक केली. त्यामध्ये काही कर्मचारी आणि पोलिस जखमी झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर नाटे परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, कर्मचाऱ्यांवर केलेल्या दगडफेकीच्या घटनेचा आज सभापती विशाखा लाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीत तीव्र निषेध करण्यात आला.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one more corona patient found in nate ratnagiri but Police in riot gear stormed of protesters by truck