काही वेळाने मुलाने वडिलांचा शोध घेतला ; जुन्या घरातील दृश्य पाहुन मुलाला बसला धक्काच

one person attend a suicide in ratnagiri for disease problem
one person attend a suicide in ratnagiri for disease problem

रत्नागिरी : शहराजवळील जाकिमिऱ्या येथे एका प्रौढाने गळफास लावून घरातच आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी (ता. ७) दुपारच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. सुनील प्रभाकर पाटील (५४, रा. जाकिमिऱ्या, रत्नागिरी) असे त्या प्रौढाचे नाव आहे.

याबाबत त्यांचा मुलगा गौरीश सुनील पाटील (२५, रा. जाकिमिऱ्या, रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात माहिती दिली. जून महिन्यापासून वडील आजारी होते. रविवारी दुपारी ते घरातून बाहेर पडले होते; परंतु बराच वेळ झाला तरी ते घरी न परतल्याने त्यांच्या मुलाने त्यांचा आजूबाजूला शोध घेण्यास सुरवात केली. शोध घेताना तो त्यांच्या उपळेकर बागेजवळील जुन्या घरात गेला असता, त्याला त्याचे वडील घराच्या किचनमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.

संपादन - स्नेहल कदम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com