रत्नागिरीत बिबट्याच्या झुंजीत एक गंभीर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

पावस - बिबट्याने आज पुन्हा एकावर हल्ला केला. यापूर्वी दुचाकीवरून येणाऱ्या पंचक्रोशीत सातजणांवर त्याने हल्ला केला. त्यामुळे अजूनही हा बिबट्या पावस पंचक्रोशीतच वावरत असल्याचे स्पष्ट झाले. वन विभाग हल्ल्यांबाबत तेव्हाही गंभीर नव्हता आणि आजही नाही अशा शब्दात ग्रामस्थांनी प्रचंड नाराजी व्यक्त करीत आहेत.

जांभूळआडी येथील प्रेमानंद कृष्णा आंब्रे (वय ३९) असे हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. ते सकाळी सहा वाजता बागेतील पंप चालू करण्यासाठी गेले होते. परतत असताना बिबट्याने त्याच्यावर समोरून हल्ला केला.

हल्ल्यातून सुटका करण्यासाठी झालेल्या झटापटीत आंब्रे यांच्या डोके, हात व पायाला बिबट्याने ओरबाडले. त्यानी आरडाओरड केल्यामुळे बिबट्या पळून गेला. आंब्रे यांच्या ओरडण्याने जवळचे लोक धावत आले. त्यांच्या शेजारी असलेले पोलिस पाटील जयंत फडके याना तातडीने फोन करून बोलावले. फडके यांनी त्यांना पावस प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वन विभागाला फडके यांनी माहिती दिल्यावर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून ते निघून गेले.

सातजणांवर हल्ला केल्यानंतर वन विभागाने रस्त्यावर गस्त घातली. बिबट्याने वनाधिकारी व त्यांनी लावलेले कॅमेरे व पिंजऱ्याकडे पाहिले देखील नाही. बिबट्याचा गावांमध्ये मुक्त संचार सुरू होता. काही दिवसांपूर्वी गणेशगुळे फाटा येथे मोटारीवर एक कुत्रा आपटला होता. हा कुत्राही बिबट्याच्या भितीने पळाल्याची चर्चा होती. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one serious in Leopard attack in Ratnagiri