चिपळूण तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

महिला मुंबईहून गावी आली होती. ती पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तिला रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते.

चिपळूण - चिपळूण तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी गेला. नारद खेराकी येथील कोरोना बाधित महिलेचा दोन दिवसापूर्वी मृत्यू झाला.
 
ही महिला मुंबईहून गावी आली होती. ती पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तिला रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते.तिथे तिचा मृत्यू झाला. चिपळूण तालुक्यात एकूण आठ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यातील पाली,कळंबस्ते आणि तळसर येथे आढळलेले रुग्ण बरे झाले आहेत.उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.दोन दिवसांपूर्वी कापरे येथील तीन आणि कोसंबी येथील एक असे चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one women death because of coronavirus in chiplun

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: