त्या आदेशाला एक वर्षाची मुदतवाढ ; प्रकाश जावडेकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्ती बनवण्यासाठी बंदी घालण्यात आली होती मात्र

कणकवली (सिंधुदुर्ग) : पर्यावरण प्रेमी आणि कट्टर धार्मिकपंतियांकडून मागणी होत असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्ती बनवण्यासाठी बंदी घालण्यात आली होती मात्र या आदेशाला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या ट्विट द्वारे दिली आहे. त्यामुळे गेले वर्षभर तयार झालेल्या प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश शाळांच्या कलाकारांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा - मासेमारी `या` कालावधीत राहणार बंद

देशभरातच नव्हे तर जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा केला जातो महाराष्ट्रात विषेशतः कोकण पट्ट्यामध्ये घरोघरी गणेश मूर्ती प्रतिष्ठापना केली जाते पूर्वीच्या काळात पारंपरिक पद्धतीने स्थानिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या मातीच्या सहाय्याने गणेश मूर्ती बनवल्या जात होत्या त्यासाठी नैसर्गिक रंगही तयार केले जात होते पण काळाच्या ओघात तंत्रज्ञानाबरोबरच गणेश मूर्ती बनवण्यासाठी व्यावसायिक रूप तयार झाले शेकडो गणेश शाळा गावागावात निर्माण झालेल्या पनवेल सारख्या भागात तर गणेशमूर्ती तयार करण्याचे कारखाने निर्माण झाले या कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती किंवा नवरात्र उत्सवासाठी देवीच्या मूर्ती तयार केल्या जात होत्या.

हेही वाचा - महाराष्ट्रातील या शाळा होणार बंद  : राज्य शासनाचा निर्णय

या मुर्त्यांचे जेव्हा विसर्जन होते त्यावेळी नदी समुद्र किंवा नाल्यांमध्ये अशा प्लास्टर ऑफ पॅरिसचे विघटन होत नव्हते त्यामुळे धार्मिक सणानंतर मूर्ती विसर्जना वरून अनेक वाईट घटना घडत होत्या. ज्या मुर्त्यांचे पूजन होते अशा मुर्त्या अस्ताव्यस्त पसरल्या जात होत्या स्वच्छता करत असताना कामगार अशा मुर्त्या जागोजागी एकत्र करून पुन्हा त्यांची विल्हेवाट लावत असा प्रकार घडत होता यावर पर्याय म्हणून आणि पर्यावरण संरक्षण या कारणाने गणेश मुर्त्या शाडू मातीच्या किंवा कागदाच्या लगद्याच्या तयार कराव्यात आणि त्या पर्यावरणास पूरक असावे असा निर्णय केंद्र शासनाने जाहीर केला होता अगदी सध्याच्या साथरोग काळात हा निर्णय घोषित करण्यात आला होता आता हा निर्णय केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मागे घेत या निर्णयाला वर्षभराची मुदतवाढ दिली यांनी दिलासा मिळाला आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One year extension to the order for Plaster of Paris Ganesh idol