महिलेला २५ लाख रुपयांची लॉटरी पडली महागत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

दापोली पोलिसांनी चार संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

दाभोळ : मोबाईल क्रमांकाला २५ लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. त्यासाठी प्रथम काही रक्‍कम भरावी लागेल असे आमिष दाखवून दापोलीतील एका महिलेची सुमारे ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दापोली पोलिसात दाखल केली आहे. दापोली पोलिसांनी चार संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - कोकणात आता या शाळांचे गेट होईल कायमचे बंद..!

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दापोली शहरातील फॅमीली माळ येथे राहणाऱ्या खैरुन बासिद मुकादम या महिलेला २६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या मुदतीत संशयित रोहित शर्मा या व्यक्तीने मोबाईलमधील सीम कार्डाला केबीसी कंपनीकडून २५ लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. त्यासाठी अगोदर काही रक्‍कम भरावी लागेल असे सांगून आनंद कुमार यांच्या स्टेट बॅंकेच्या खात्यात १२ हजार २०० रुपये संदीप कुमार यांच्या खात्यात रुपये २८ हजार असे एकूण ४० हजार २०० रुपये भरण्यास सांगितले. 

हेही वाचा - कृषी खात्यातील बेफिकीरीचे तण आता निघणार ; हे करणार कापणी

 

या महिलेने ही रक्‍कम संशयितांनी सांगितलेल्या खात्यात भरली. मात्र तिला २५ लाख रुपये काही मिळाले नाहीत. अखेर या माहिलेने दापोली पोलिस ठाणे गाठून रोहित शर्मा, बॅंक खातेदार संदीप कुमार व आनंद कुमार, बॅक मॅनेजर पटेल यांचे विरोधात फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरुन पोलिसांनी चारही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अशोक गायकवाड करत आहेत.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online fraud with a women in ratnagiri 40000 was lost by her from his account