
पाली : ऑनलाईन खरेदीत ग्राहकांची कशी फसवणूक होते याचा प्रत्यय पालीत आला आहे. येथील जनार्दन भिलारे या पदवीधर शिक्षकांनी सोमवारी (ता. 9) फ्लिपकार्टवरून ऑनलाइन शॉपिंगवर सिलिंग फॅन मागवला होता. मात्र या फॅनच्या खोक्यामध्ये चक्क विटा पाठवण्यात आल्या. यामुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रास झाला. कंपनीसोबत भांडून तक्रार केल्यानंतर त्यांना त्यांचे पैसे रिफंड करण्यात आले.