१०० शाळा बंदच ; रत्नागिरीत २६ हजार विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात

only 26 thousand students in school in ratnagiri 100 schools closed till the date
only 26 thousand students in school in ratnagiri 100 schools closed till the date
Updated on

रत्नागिरी : शाळा सुरू करण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर पंधरा दिवसांनंतरही जिल्ह्यातील ३४९ शाळांमध्ये प्रत्यक्ष शिकवणीचे काम सुरू झाले आहे. ८३ हजारपैकी २५ हजार ९७१ विद्यार्थी प्रत्यक्ष शिकवणीसाठी वर्गात हजर राहतात. उर्वरितांपैकी ५० टक्‍केच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवणीचा फायदा होत आहे. कोरोनाची लस बाजारात आल्यानंतर हे प्रमाण वाढेल, अशी आशा असली तरीही कोरोनाच्या भीतीमधून शहरी भागातील पालक अजूनही सावरलेले नसल्याचे दिसत आहे.

शाळांचे प्रशासकीय कामकाज कोरोना काळातही सुरू होते; मात्र शिकवणीसाठी ऑनलाइनचा आधार घेतला जात होता. राज्य शासनाने नववी ते बारावीच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पालकांचे संमतीपत्र अत्यावश्‍यक केले होते. शासनाच्या भूमिकेबाबत पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. माध्यमिक शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांची बैठक घेऊन शाळा सुरू करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या होत्या.

पहिल्या दिवशी अत्यल्प प्रतिसाद मिळाला. हळूहळू त्यामध्ये वाढ झाली असून पंधरा दिवसानंतर २५ हजार ९७१ विद्यार्थी शाळेत हजर झाले. रत्नागिरीसारख्या शहरी भागात हे प्रमाण अत्यंत कमी आहे. ग्रामीण भागामध्ये शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण चांगले आहे. अजूनही पालक विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी संमती देत नाहीत. पावस येथे शिक्षक बाधित आढळल्यानंतर तेथील माध्यमिक शाळा महिनाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. ती परिस्थिती अन्य शाळांमध्ये उद्‌भवू नये, यासाठी माध्यमिक शिक्षक विभागाकडून कडक सूचना दिल्या आहेत.

"सुरवातीला विद्यार्थी शाळेत येण्याचे प्रमाण कमी होते. पालकही सकारात्मक होत असून मुलांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद असला तरीही शहरात तो अल्प आहे."

- जी. एन. चौधरी, उपशिक्षणाधिकारी

संपादन - स्नेहल कदम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ratnagiri food safety raid on fake paneer
Mumbai Goa Highway landslide update
MNS threatens protest in Sudhagad Taluka against the installation of smart meters by Mahavitaran
ANS (Andhashraddha Nirmulan Samiti) and women's organizations in Pen organize 'Vatsavitri te Vatdharitri' campaign for tree plantation
Marathi News Esakal
www.esakal.com