राज ठाकरेंच्या वाढदिनानिमित्त मनसेतर्फे खुली निबंध स्पर्धा

राज ठाकरेंच्या वाढदिनानिमित्त मनसेतर्फे खुली निबंध स्पर्धा

राज ठाकरेंच्या वाढदिनानिमित्त
मनसेतर्फे खुली निबंध स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिनानिमित्त जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित खुली निबंध स्पर्धेचे आयोजित केली आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी ३ हजार ३३३ रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय २ हजार २२२ रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक १ हजार १११ रुपये व सन्मानचिन्ह अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
स्पर्धेसाठी भ्रष्ट शासकीय यंत्रणा बिल्डरांच्या पथ्यावर, व्हाईट कॉलर बिल्डर बनले शहरांचे भक्षक, सांडपाणी (ड्रेनेज वॉटर) व्यवस्था भविष्यातील शहरांची डोकेदुखी/मोठी समस्या आणि बिल्डरः शहरांचे विकासक की भकासक असे विषय आहेत. शब्द मर्यादा ७०० शब्दांची आहे. ही निबंध स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित असून, स्पर्धकांनी आधार कार्ड झेरॉक्ससह १० जूनपर्यंत धीरज परब, साई दर्शन बिल्डींग, ब्लॉक १, साई मंदिर समोर, हिंदू कॉलनी (ता. कुडाळ) येथे पाठवावेत. निबंध स्पर्धा खुल्या गटासाठी आहे. बक्षीस वितरण १४ जूनला होईल. निबंधासोबत नाव, पत्ता, संपर्क क्रमांकाची नोंद करावी. अधिक माहितीसाठी यतीन माजगावकर व निरंजन रावराणे यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन धीरज परब यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com