रत्नागिरी : भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर नौदल विभाग व मत्स्य व्यवसाय विभागाची ७ मे रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये भारतीय नौदल विभागाकडून ‘ऑफशोअर डिफेन्स एरिया’ मासेमारी प्रतिबंध क्षेत्र (No fishing zone) घोषित करण्यात आले आहे. नौदल विभागाने आखून दिलेल्या परिसरामध्ये कोणतीही नौका आढळून आल्यास दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे (Shoot to Kill) आदेश नौदल विभागास देण्यात आलेले आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा याबाबत सुरक्षित असला तरी मत्स्यविभागाने (Fisheries Department) सतर्कता बाळगत सर्व नौकांची कसून तपासणी सुरू केली आहे.