ऑनलाईन सभेला नगरसेवकांचा आक्षेप, ठरावांनाही विरोध

एकनाथ पवार
Saturday, 15 August 2020

तालुक्‍यात नेटवर्कची सुविधा तितकीशी चांगली नाही. आज सभा सुरू असताना दोनदा संपर्क तुटल्याने सभेत कोणत्या विषयावर काय चर्चा झाली हे समजु शकलेले नाही.

वैभववाडी (सिंधुदुर्ग) -  येथील नगरपंचायतीच्या आज झालेल्या सर्वसाधारण ऑनलाईन सभेला दोन नगरसेवकांनी आक्षेप घेतला. सभा सुरू असताना दोनदा संपर्क तुटला. त्यामुळे सभेत नेमकेपणाने कोणती चर्चा झाली हे समजु शकले नाही. त्यामुळे आजच्या सभेत झालेल्या ठरावांना देखील त्या दोन्ही नगरसेवकांनी विरोध दर्शविला. 

येथील नगरपंचायती आजची सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. या सभेला नगरसेवक अक्षता जैतापकर आणि नगरसेवक संतोष माईणकर यांनी नगराध्यक्षांकडे आक्षेप नोंदविला. तालुक्‍यात नेटवर्कची सुविधा तितकीशी चांगली नाही. आज सभा सुरू असताना दोनदा संपर्क तुटल्याने सभेत कोणत्या विषयावर काय चर्चा झाली हे समजु शकलेले नाही. त्यामुळे आजच्या सभेत झालेल्या ठरावांना आपला विरोध राहणार आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सभा सोशल डिस्टन्सिंग पाळुन घेतल्या जातात. त्याचप्रमाणे नगरपंचायतीची सभा देखील घेतली जाऊ शकते; मात्र तसे न करता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभा घेतली गेली. ही सभा आम्हाला मान्य नसून आजची सर्वसाधारण सभा पुन्हा घ्यावी, अशी मागणी या दोन्ही नगरसेवकांनी नगराध्यक्षांकडे केली. 

नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्यावी, असा शासन निर्णय 3 जुनला झाला आहे. त्या निर्णयानुसारच सभेचे आयोजन केले होते. सर्वसाधारण सभेला 19 सदस्य असतात. तर स्थायी समिती व इतर समितीचे सदस्य कमी आहेत. त्यामुळे सर्वसाधारण सभा वगळुन अन्य सभा थेट होणार आहे. 
- सुरज कांबळे, मुख्याधिकारी, वैभववाडी 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: opposing the online meeting vaibhavwadi konkan sindhudurg