विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आजपासुन कोकण दौऱ्यावर, उद्या रत्नागिरीत दाखल

राजेश कळंबटे
Friday, 23 October 2020

कोकणात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.

रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील उध्वस्त झालेल्या नुकसानग्रस्त भागांचा सलग पाच दिवसांचा झंझावती दौरा केल्यानंतर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर २३ ते २५ ऑक्टोबर दरम्यान कोकणात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील आणि कोकणातील काही जिल्ह्यांना परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. परिणामी हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले. बहुतेक भागात जिवितहानी झाली असून जनावरेही दगावली आहेत. पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करुन शेतकरी, ग्रामस्थ यांना भेटण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर कोकणातील नुकसानग्रस्त जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. 

हेही वाचा - म्हणून दसऱ्याला घटावर होते अठरा धान्यांची पेरणी -

विरोधी पक्ष नेते दरेकर शुक्रवार २३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता पोलादपूर येथील कापडे गावातील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहाणी करणार आहेत. सायंकाळी  ५ वा. खेड येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी करणार आहेत. तर शनिवार २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वा. सोमेश्वर, (ता.रत्नागिरी) मझील सोमेश्वर चिंचखरी येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहाणी करणार आहेत, तर सकाळी १० वा. निवली, येथील व अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहाणी करणार आहेत.  

सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आणि कृषी अधीक्षक यांच्या समवेत अतिवृष्टीच्या परिस्थिती संदर्भात चर्चा करणार आहेत. त्यानंतर विरोधी पक्ष नेते दरेकर यांची दुपारी १२ ला रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. दुपारी ३ वाजता लांजा येथे अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या भागांना भेटी देतील. रविवार २५ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत.  

हेही वाचा - विद्यार्थ्यांनो दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर -

सकाळी ९ वा. वाघदे, (ता. कणकवली) येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहाणी करतील तर सकाळी ९.३० वा. ओरसगाव, येथील भागांची पाहणी करतील. त्यानंतर सकाळी १०.३० वा. ओरस, सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी व कृषी अधीक्षक, यांचे अतिवृष्टीच्या परिस्थिती संदर्भात चर्चा करणार आहेत. त्यानंतर  सकाळी ११.३० वा.  दरेकर यांची ओरस येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: opposite party member pravin darekar on konkan tour for the observation of damages the crop of farmers in konkan districts