कोटपा कायदा म्हणजे काय रे भाऊ .... ?

Oras Action On Smokers Kokan Marathi News
Oras Action On Smokers Kokan Marathi News

ओरोस( सिंधुदूर्ग) : धूम्रपान आणि तंबाखू - मावा सेवनाच्या व्यसनामुळे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. त्यात मुले आणि महाविद्यालयीन युवक बळी ठरत आहेत. त्यांचे दुष्पपरिणाम लक्षात घेता सिंधुदुर्ग पोलिसांनी जिल्हा पोलिस अधीक्षक दिक्षित गेडाम यांच्या नेतृत्वाखाली तंबाखू विरोधी कोटपाची विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यात सार्वजनिक धूम्रपान आणि शाळा - कॉलेजजवळ तंबाखूची अवैध विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली. वेंगुर्ले, सावंतवाडी आणि मालवण येथे ही कारवाई करण्यात आली.

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून कायद्याचे उल्लघंन करणाऱ्यांवर सिगारेट - तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायदा (कोटपा) अंतर्गत कडक कारवाई करण्यात येते. त्यांचे खास प्रशिक्षण जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक दिक्षित गेडाम तसेच अपर पोलिस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध हेल्थ फाऊंडेशनतर्फे देण्यात आले. तसेच फाऊंडेशनच्या माध्यमातून कृती कार्यक्रमही आखला आहे.

विक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले
वेंगुर्ले पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांचा नेतृत्वाखाली वेंगुर्ले पोलिसांनी कोटपा कायद्यानुसार शाळा, महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्या पान टपऱ्या दुकानांवर कारवाई केली. कोटपा कायदा कलम ४ नुसार सार्वजनिक धूम्रपान करणारे आणि कोटपानुसार वेंगुर्ले बाजार, मारुती नाका आणि शाळा परिसरात ही कारवाई केली. यामुळे तंबाखू सिगारेटची अवैध विक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले असून स्थानिकांकडून पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले जात आहे. वेंगुर्लेप्रमाणे संध्याकाळी सावंतवाडी येथे ही कारवाई झाली.

५० टक्के कॅन्सर केवळ तंबाखूमुळे
एकूण कॅन्सर रुग्णांपैकी सर्वात जास्त म्हणजे ५० टक्के कॅन्सर हे केवळ तंबाखू वापरामुळे होतो. केवळ ३० टक्केच लोक रुग्णालयात उपचार घेतात. समाजात तंबाखू सेवनावर प्रतिबंध आल्याशिवाय त्याचे प्रमाण कमी होणार नाही. कोटपा कायद्याची प्रभावी अमंलबजावणी केल्यास तंबाखूमुळे होणारे कॅन्सरचे प्रमाण कमी करता येईल, असे केअरिंग फ्रेंडसचे निमेश सुमती यांनी सांगितले.

कोटपा कायदा म्हणजे काय?
सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध कायदा अधिनियम २००३ हा केंद्राचा कायदा आहे. या कायद्यात एकूण पाच प्रमुख कलमे आहेत. त्यापैकी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे. कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड आवारात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहे. तसेच बालकांना किंवा बालकांकडून तंबाखूजन्य पदार्थ विक्री केल्यास १ लाख रुपये आणि ७ वर्ष शिक्षेची तरतूद आहे. बाल न्याय कायद्यानुसार कारवाई करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com