सेंद्रिय शेतीचा फुलविला मळा; कष्ट आले फळाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेंद्रिय शेतीचा फुलविला मळा; कष्ट आले फळाला

सेंद्रिय शेतीचा फुलविला मळा; कष्ट आले फळाला

मंडणगड : प्रयोगशील शेतीच्या ध्यासातून आर्थिक स्वावलंबन साध्य करणाऱ्या तालुक्यातील वडवली येथील सुरेश कानू मोडकले व पत्नी सुनीता या शेतकरी दाम्पत्याने अथक परिश्रमाने आदर्श सेंद्रिय शेतीचा मळा फुलविला आहे. एकरात २७ प्रकारच्या फळ, भाजीपाला लागवडीतून कमी जागेत जास्त उत्पादनाचे यशस्वी प्रात्यक्षिक गेली ३० वर्षे ते करत आहेत. पावसाळ्यात पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने चारसुत्रीचा अवलंब करीत यावर्षी तीन किलो बियाणे वापरून १२ गुंठे क्षेत्रात लाल भाताचे १२ मणाचे उत्पादन त्यांनी घेतले. यावर्षी भात पीक स्पर्धेत तालुक्यात दुसरा क्रमांक मिळविला.

सध्या शेतात चार टप्प्यांत कलिंगडाची ठिबक सिंचनात लागवड केली आहे. सोबत वांगी, मिरची, चवळी, पावटा, तूर, घेवडी, काकडी, कलिंगड, दुधी, पडवळ, कारली, वाली, मुळा, पालक, माट, कोथिंबीर, भेंडी, टोमॅटो, शेवगा, तेंडली, कुळीथ असा विविध २७ प्रकारचा मिक्स भाजीपाला केला आहे. कोन्हवली, देव्हारे व आजूबाजूच्या गावांत विक्रीतून त्यांना चांगला आर्थिक फायदा मिळतो. १२०० मीटर लांबीच्या १६ एमएमच्या पाईपातून डोहाचे पाणी आणत तांबड मातीत पीक होत नाही, हे विधान खोटे ठरविले आहे. गवत, पालापाचोळा, भाताचा कोंडा जमिनीत गाडून खत निर्मितीने करण्यावर त्यांचा भर असतो.

बांधावर मचाण...आपलं दुसरं घरच बांधलं

जंगली श्वावदे, रानडुक्कर, केलटी यांचा उपद्रव असल्याने रात्रंदिवस शेतात राहावे लागते. बांधावर मचाण रुपात आपलं दुसरं घरच बांधले आहे. परिसराला झाडांच्या फांद्या, काटेरी वनस्पती, साड्या यांचे कुंपण घातले आहे. पिकांच्या संरक्षणासाठी शेतात रक्षण सापळे लावले आहेत. स्वतःच्या अनुभवाला कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची जोड त्यानी दिली आहे.

त्यांना दिली चपराक..

मुंबई सोडून १९९२ पासून गावी स्थायिक झालेल्या सुरेश मोडकले यांनी शेती करण्याचा निश्चय केला. वडिलोपार्जित शेतीचा वारसा चालवतबारमाही शेती करून आर्थिक स्रोत निर्माण केला. आपल्या चारही मुलांना उच्चशिक्षण देत स्वतःच्या पायावर उभे केले. शेतीच्या जीवावरच कुटुंबाचा भार उचलत शेतीत काय? असे म्हणणाऱ्यांना चपराक दिली आहे.

दृिष्टक्षेपात

  • ठिबक सिंचनानाचा वापर

  • रोपांच्या मुळाशी शेणमिश्रित पाणी

  • फक्त शेणखत व जीवामृत फवारणी

  • त्यासाठी पाळीव जनावरे कायम सोबत

  • नांगरणी, खत, दूध असा तिहेरी उपयोग

Web Title: Organic Farming 27 Types Of Fruits Vegetables Red Rice Mandangad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..