मुंबई-गोवा महामार्गापासून शंभर मीटरवर ओसरगाव येथे २५ फेब्रुवारीला मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास जळत असलेला मृतदेह सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांच्या निदर्शनास आला होता.
कणकवली : ओसरगाव येथील महामार्गालगत (Osargaon Highway) जळणाऱ्या मृतदेहाचा अखेर उलगडा झाला. किनळे (ता. सावंतवाडी) येथील अंगणवाडी सेविका (Anganwadi Sevika) सुचिता सुभाष सोपटे (वय ५९) यांचा खून करून मृतदेह जाळण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. कर्जबाजारी असल्याने दागिने आणि पैशांच्या आमिषाने संशयित वेतोरिन रुजॉय फर्नांडिस (४५, रा. वेंगुर्ले, आरवली) याने हे क्रूर कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयिताला गुरुवारी रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले.