परजिल्ह्यातील मुलांना प्रवेश नको ; संबंधित शाळांवर होणार आता कारवाई

other villages student do not give admission in school in ratnagiri
other villages student do not give admission in school in ratnagiri
Updated on

रत्नागिरी : नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी परजिल्ह्यातील मुलांना ज्या शाळा प्रवेश देत आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत केली. याबाबत आधारकार्डवरून संबंधितांची तपासणी करण्याच्या सूचना अध्यक्ष रोहन बने यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत.

जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत नवोदय विद्यालयातील प्रवेशावरून दीपक नागले यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. जिल्ह्यातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी नवोदय विद्यालय सुरू करण्यात आले आहे; मात्र या शाळेत बहुतांश विद्यार्थी हे परजिल्ह्यातीलच असतात. या प्रवेशासाठी काही खासगी आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पाचवीसाठी प्रवेश घेतला जातो. काही वर्षांपूर्वी हा प्रकार उघड झाला होता.

राजापूरमधील अनेक पालक नवोदयमध्ये प्रवेशासाठी पुढे येतात; मात्र परजिल्ह्यातील मुलांनाच प्रवेश मिळतो. जर स्थानिक मुलांना लाभ देण्यासाठी हे विद्यालय असेल तर तो मिळालाच पाहिजे. यंदाचे प्रवेश ताबडतोब रद्द करावेत. यामध्ये अधिकाऱ्यांनी, शाळांच्या मुख्याध्यापकांनी सहकार्य केले असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नागले यांच्यासह अन्य सर्व सदस्यांनी केली.  

शिष्यवृत्तीला बसणाऱ्यांची संख्या कमी

जिल्हा परिषदेचे पाचवीचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला कमी बसतात. असा प्रश्‍न सदस्यांनी उपस्थित केला. सध्या बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी मेरीटमध्ये आल्यानंतर अधिकारी पाठ थोपटून घेतात. मेरीटमधील विद्यार्थी संख्या वाढत असली तरीही पाचवीतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या आणि परीक्षेला बसलेले यामध्ये मोठी तफावत आहे. गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न केला पाहिजे, अशा सूचना सदस्यांनी केल्या.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com