घरकुल उभारणीत सिंधुदुर्ग राज्यात अव्वल 

द

सिंधुदुर्गनगरी : प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2016-17 ते आज अखेरपर्यंत एकूण 2807 घरांचे उद्दिष्टांपैकी 2509 घरे पूर्ण करून 90 टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. घरकुल योजनेच्या 2016-17 ते 2018-189 या पहिल्या टप्प्यातील अंमलबजावणीत जिल्हा राज्यात अग्रेसर राहिला आहे. त्यामुळे राज्यपालाच्या हस्ते जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालकांचा सत्कार केला. या वर्षी आधार लिंकिंग व अन्य ऑनलाईन कारभारात सिंधुदुर्ग देशात 87 वा तर राज्यात प्रथम राहिला आहे. 

केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास घरकुल योजना, रमाई घरकुल योजना, शबरी आवास योजना, आदिम जमाती घरकुल योजना, तर भूमिहीन लाभार्थींना घरासाठी जमीन खरेदीसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना कार्यान्वित आहे. या योजनेच्या माध्यमातून विविध घटकांतील गोरगरीब जनतेला घरकुलांचा लाभ दिला जातो. 

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी केंद्राचा 60 टक्के निधी व राज्य शासनाचा 40 टक्के निधी खर्च केला जात असून, प्रत्येक घरकुलासाठी एक लाख 20 हजार रुपये निधी दिला जातो. केंद्राच्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 2016-17 ते 2018-19 या तीन वर्षांसाठी एकूण 2071 घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले होते. पैकी 1814 घरकुलांना मंजुरी देऊन 1773 घरकुले बांधून पूर्ण केली आहेत. यामध्ये 98 टक्के काम पूर्ण झाले आहे तर तांत्रिक अडचणीमुळे अपूर्ण राहिलेली 41 घरे या वर्षी पूर्ण करण्यात येणार आहेत. यामध्ये अनुसूचित जाती व जमातींसाठी 257 घरांचे उद्दिष्ट असले तरी केवळ 48 लाभार्थींचे प्रस्ताव प्राप्त झाल्याने उर्वरित 209 घरकुले पूर्ण करण्यासाठी इतर प्रवर्गातील लाभार्थींना लाभ देता यावा, यासाठी शासनाकडे मागणी केली आहे. 

केंद्राचा 60 टक्के आणि राज्य शासनाचा 40 टक्के निधी खर्च करून राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 2019-20 मध्ये एकूण 993 घरकुलांचे उद्दिष्ट होते. त्यात 993 घरकुलांना मंजुरी देऊन 736 घरकुले पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत 75 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित 257 घरकुले पावसाळ्यानंतर पूर्ण करण्यात येणार आहेत. जागा उपलब्ध नाही, रस्ता नाही अशा तांत्रिक अडचणींमुळे काही घरे प्रलंबित आहेत. 
2016-17 ते 2018-19 या पहिल्या टप्प्यात आधार लिंकिंगमध्ये राज्यात तिसरा क्रमांक आला होता. रमाई आवास योजना घरकुले पूर्ण करण्यात राज्यात दुसरा क्रमांक आला होता. त्यामुळे जिल्हा यंत्रणेचे तत्कालीन प्रकल्प संचालक दीपक चव्हाण यांचा 20 नोव्हेबर 2011 रोजी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. 


रमाई घरकुल योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 2016-17 व 2017-18 या आर्थिक वर्षात 1764 घरकुलांना मंजुरी दिली होती. पैकी 1358 घरकुले बांधून पूर्ण आहेत. या योजनेचे आतापर्यंत 77 टक्के काम पूर्ण आहे. उर्वरित घरकुले पावसाळा संपताच पूर्ण होतील; मात्र 2018-19 व 2019-20 या आर्थिक वर्षात रमाई घरकुल योजनेसाठी समाजकल्याण विभागाकडून अद्याप निधी प्राप्त झाला नाही. यामुळे योजनेचे काम मंदावले आहे. 
- जगदीश यादव, प्रभारी प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा 

संपादन : विजय वेदपाठक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com