esakal | कोरोनाचा कहर; सिंधुदुर्गातील पाच तालुक्यात सक्रिय रुग्णसंख्या 100 वर

बोलून बातमी शोधा

Over 100 active patients in five talukas of Sindhudurg

कोरोना रुग्ण वाढीचा कहर सुरूच असून शनिवारी तब्बल 141 नवीन कोरोना रुग्ण मिळाले. तीन रुग्णांचे निधन झाले.

कोरोनाचा कहर; सिंधुदुर्गातील पाच तालुक्यात सक्रिय रुग्णसंख्या 100 वर
sakal_logo
By
विनोद दळवी

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांतील सक्रिय रुग्णसंख्या 100 च्या वर गेली आहे. यात देवगड, कणकवली, कुडाळ, मालवण व सावंतवाडी या तालुक्‍यांचा समावेश आहे. जिल्ह्यात एक हजार तीन रुग्ण सक्रिय आहेत. 

दरम्यान, कोरोना रुग्ण वाढीचा कहर सुरूच असून शनिवारी तब्बल 141 नवीन कोरोना रुग्ण मिळाले. तीन रुग्णांचे निधन झाले. दिवसभरात 49 जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात आता सक्रिय रुग्णसंख्या एक हजार तीन आहे. यातील 35 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. 
जिल्ह्याची वाटचाल धोकादायक स्थितीकडे सुरू आहे. 

एप्रिलमध्ये दररोज मोठ्या संख्येने रुग्ण मिळत आहेत. दहा दिवसांत 865 रुग्ण मिळाले. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या एक हजारवर गेली आहे. एवढी संख्या सप्टेंबर- ऑक्‍टोबर 2020 मध्ये होती. त्यानंतर एवढी रुग्ण वाढ नव्हती. 

जिल्ह्यातील एकूण बाधित संख्या सात हजार 987 रुग्ण झाले. शनिवारी 49 रुग्णांनी कोरोनावर मात केली. शनिवारी आणखी तीन रुग्णांचे निधन झाल्याने मृत्यू झालेल्या रुग्णाची संख्या 196 झाली, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. 

35 रुग्णांची प्रकृती चिंताजनक
1003 सक्रिय रुग्णांपैकी 35 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील 30 जण ऑक्‍सिजनवर, तर पाच व्हेन्टीलेटरवर आहेत. आर.टी.पी.सी.आर टेस्टमध्ये 48 हजार 346 नमुने तपासले. यातील पाच हजार 506 नमुने पॉझिटिव्ह आहेत. आज 1153 नमुने घेतले. अँटिजेन टेस्टमध्ये एकूण 31 हजार 605 नमुने तपासले. पैकी दोन हजार 623 नमुने पॉझिटिव्ह आहेत. नवीन 51 नमुने घेतले. आतापर्यंत एकूण 79 हजार 951 नमुने तपासण्यात आले. 

तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व कंसात मृत्यू 
देवगड 718 (15), दोडामार्ग 408 (5), कणकवली 2299 (50), कुडाळ 1712 (36), मालवण 793 (21), सावंतवाडी 1049 (44), वैभववाडी 305 (14), वेंगुर्ले 656 (10) जिल्ह्याबाहेरील रुग्ण 47 (1). 

तालुकानिहाय सक्रिय रुग्ण 
देवगड - 189, दोडामार्ग - 34, कणकवली - 188, कुडाळ - 179, मालवण - 129, सावंतवाडी-111, वैभववाडी - 84, वेंगुर्ले- 76 व जिल्ह्याबहेरील 15. 

वैभववाडीतील दोघांचा तर मालवणातील एकाचा मृत्यू 
मालवण तालुक्‍यातील वायरी येथील 78 वर्षीय महिलेचा शनिवारी कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. वैभववाडी तालुक्‍यातील नाधवडे येथील 60 वर्षीय पुरुषाचाही मृत्यू झाला. त्यांना दमा, उच्चरक्तदाब व मधुमेहाचा आजार होता. नानिवडे येथील 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असून, त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. 

संपादन : विजय वेदपाठक