
-राजेंद्र बाईत
राजापूर : राजापूर-लांजा तालुका नागरीक संघ आणि श्री मनोहर हरि खापणे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण आणि पश्चिम घाट परिसर जोडणार्या अणुस्कुरा घाट आणि उगवाई मंदीर परिसरामध्ये वड, पिंपळ, आंबा, काजू यांसारखी विविध प्रकारची दिर्घायुष्य असलेली सुमारे शंभरहून अधिक झाडांची लागवड करीत सामाजिक बांधिलकी जोपासली. गेल्या काही वर्षामध्ये अणुस्कूराच्या डोंगररांगातील दरडींची माती आणि दगडी सातत्याने कोसळण्याची घटना घडत आहेत. अणुस्कूरा घाट मार्गातील भूस्खलनासारख्या घटना रोखण्यासह पर्यावरण जतन आणि संवर्धनाला विविध प्रकारच्या दिर्घायुष्य वृक्षांची झालेली लागवड एकप्रकारे सहाय्यभूत ठरणार आहे.