esakal | चिपळूणातील रुग्णालात 2 महिने ऑक्सिजन प्लांटची यंत्रणा पडून
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूणातील रुग्णालात 2 महिने ऑक्सिजन प्लांटची यंत्रणा पडून

चिपळूणातील रुग्णालात 2 महिने ऑक्सिजन प्लांटची यंत्रणा पडून

sakal_logo
By
टीम ई सकाळ

चिपळूण : तालुक्यातील कामथे उपजिल्हा रुग्णालयात राज्य सरकारने ५० सिलेंडरचा ऑक्सिजन प्लांट मंजूर केला आहे. त्यासाठी काही यंत्रणाही येथे दाखल झाली आहे; मात्र अजूनही काही मशिनरी परदेशातून यायच्या असल्याने दोन महिने ही यंत्रणा रुग्णालयात पडून आहे. परिणामी ऑक्सिजनच्या सिलेंडरसाठी आरोग्य यंत्रणेला नेहमी कसरत करावी लागत आहे.

कामथे उपजिल्हा रुग्णालयाला कोविड रुग्णालय म्हणून जाहीर केल्यानुसार येथे ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा व्हावा, यासाठी हालचाली सुरू झाल्या. ऑक्सिजनचा पुरवठा वेळेत होणे आवश्यक असून ऑक्सिजनअभावी काहींचे प्राणही दगावले आहेत. रुग्णाची ऑक्सिजन पातळी कमी होत असतांना त्याला ऑक्सिजन सिलेंडर मिळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी येथे ऑक्सिजन बेड्सही आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येथे भविष्यात ऑक्सिजनचा साठा असणे आवश्यक आहे. यासाठी एप्रिल महिन्यात येथे ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी हालचाली सुरू झाल्या. त्यानंतर ऑक्सिजन प्लांटसाठी आवश्यक असलेली यंत्रणाही दाखल झाली. परंतु आता दोन महिने झाले ही यंत्रणा रुग्णालयात पडून आहे. कामथे रुग्णालयात नियमितपणे ८० ते ९० रूग्ण असतात. त्यामुळे या रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटची नितांत गरज आहे.

हेही वाचा: Good News - आता दाखल्याशिवाय मिळणार शाळेत प्रवेश

रिकामा ड्युरा सिलेंडर जोडल्याचा प्रकार

तूर्तास काही सामाजिक संस्थांनी दिलेल्या ड्युरा सिलेंडर व जम्बो सिलेंडरच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. लोटे येथून सिलेंडर भरून आणावे लागत असल्याने कायम त्यावर लक्ष केंद्रित करावे लागत आहे. नुकताच या रुग्णालयात चक्क रिकामा ड्युरा सिलेंडर जोडल्याचा प्रकार घडला. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने हा अनर्थ टळला. अन्यथा, तेथे उपचार घेत असलेल्या ५० रुग्णांना त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता होती. त्यामुळे या रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटचे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी होत आहे.

एक नजर..

  • रुग्णाच्या ऑक्सिजनसाठी ऑक्सिजन सिलेंडर गरजेचे

  • एप्रिलमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी हालचाली

  • ऑक्सिजन प्लांटसाठी आवश्यक यंत्रणाही दाखल

  • आता दोन महिने झाले ही यंत्रणा रुग्णालयात पडून

  • कामथे रुग्णालयात नियमितपणे ८० ते ९० रूग्ण

  • रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटची नितांत गरज

  • सध्या ड्युरा, जम्बो सिलेंडरच्या माध्यमातून पुरवठा

हेही वाचा: कोकणात मुसळधार पावसाची शक्यता; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

loading image