
पालघरः केळवे येथे एका रिसॉर्टमध्ये प्रियकारासोबत आलेल्या एका विवाहित महिलेचा शुक्रवारी सायंकाळी संशयास्पद मृत्यू झाला असून या प्रकरणात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र मृताच्या नातेवाईकांनी मृत महिलेच्या कानातून रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आल्याने या मृत्यूविषयी संशय व्यक्त केला जात आहे.