

Shocking Dumper Accident in Pali Town
Sakal
पाली : अष्ठविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात शनिवारी (ता. 17) सायंकाळी एक भीषण अपघात घडला. ग. बा. वडेर हायस्कूल जवळील शतायु मेडिकल समोरून खडी घेऊन जाणाऱ्या एका डंपरचा मागील फाळक्याची कडी अचानक तुटून मागील बाईकस्वाराच्या तोंडाला लागली. या अपघातात बाईकस्वार जबर जखमी झाला असून त्याच्या तोंडाला व जबड्याला मोठी दुखापत झाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.