

Poor condition of Pali-Khopoli State Highway and dangerous potholes in Hedavali
Sakal
पाली : पाली-खोपोली राज्य महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काही वर्षांपूर्वीच या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले होते, मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या काही वर्षांतच रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सध्या या महामार्गावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून, हेदवली येथे तर रस्त्याच्या कडेला मोठा आणि धोकादायक खड्डा पडला आहे, ज्यामुळे येथे कधीही मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.