

Raigad Pali Protest Residents Gherao Nagar Panchayat Over Property Tax Increase Water Supply And Civic Issues
esakal
पाली: अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली शहरात प्रलंबित नागरी समस्या आणि प्रशासनाकडून लादण्यात येणाऱ्या प्रस्तावित घरपट्टी करवाढी विरोधात नागरिक आक्रमक झाले आहेत. प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध करत पाली-सुधागड संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. 2) पाली नगरपंचायतीवर एक भव्य आणि ऐतिहासिक ‘संघर्ष मोर्चा’ काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून सुरू झालेल्या या मोर्चात शेकडोच्या संख्येने नागरिक, व्यापारी, तरुण व ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. घोषणाबाजी करत आलेल्या नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयाला घेराव घातला.