

Heavy Devotee Rush at Ballaleshwar Temple on New Year
Sakal
पाली : नवीन वर्षातील पहिल्या दिवशी अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी गुरुवारी (ता. 1) भाविकांनी मोठी गर्दी केली होती. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने भाविक पालीत दाखल झाले होते.