पाली : मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; मुद्देमाल व 2 जण ताब्यात

पाली बसस्थानकाजवळील शिवसेना भवनच्या पाठीमागे हा जुगार अड्डा सुरु होता.
Pali Crime
Pali Crimesakal
Updated on

पाली : पाली बस स्थानकाजवळील (pali Bus Stand) शिवसेना भवन कार्यालयाच्या (Shiv Sena Office) पाठीमागील बाजूस असणा-या गल्लीत सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर मंगळवारी (ता.28) पाली पोलिसांनी छापा टाकला आहे. या छाप्यात तब्बल 1,67,300 किमतीचा मुद्देमाल व रोख रक्कम आणि 2 जण ताब्यात घेण्यात आले आहेत. (Pali Crime News)

याबाबत सविस्तर माहिती अशी की पोलीस कॉन्स्टेबल अतुल चंदनशिवे व पोलीस नाईक शेडगे हे बीट मार्शल पेट्रोलिंग डयुटीकरीता हजर होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे यांना या ठिकाणी अवैध मटका धंदा सुरू असल्याची माहिती गुप्त बातमीदार मार्फत मिळाली.

Pali Crime
पुणे : कोरेगाव भिमा येथे पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त

त्यानुसार सदर बाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती बोराटे यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाने चंदनशिवे व सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे, पोलीस नाईक म्हात्रे व शेडगे यांनी छापा टाकला. यावेळी पोलीसांनी धावत जावून दोन संशयितांना पकडले. यावेळी त्यांच्याकडे एक पावती बुक, पावत्या इतर साहित्य रोख रक्कम व स्कुटी मोटारसायकल मिळून आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Unusual Discovery in Raigad: Rare Albino Alligator Gar Fish Found in River
Ganeshotsav 2026: Thane Enhances Konkan Railway Ticket Booking with Additional Counters
Historic Satavali Fort conservation
Giant python rescued from house in Palghar
Marathi News Esakal
www.esakal.com