

Massive Devotee Turnout on Year-End Sankashti Chaturthi
Sakal
पाली : संकष्टी चतुर्थीला रविवारी अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत भाविकांचा भक्तिमळा फुलला होता. रविवारी सुट्टी असल्यामुळे महाराष्ट्रातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्री. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पहाटे पासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र वाहतूक कोंडीने भाविक व प्रवासी बेजार झाले होते. गणपती मंदिराच्या शेजारी पाली भिरा मार्गावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. दुपार नंतर वाहतूक कोंडी आणखीन वाढली. त्यामुळे भाविक व नागरिकांनी अक्षरशः संताप व्यक्त केला. स्थानिक प्रशासन व पोलीस यांच्या नियोजनाचा अभाव यावेळी दिसून आला.