
पाली : रायगड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीला सुरुवात झाल्यावरती जिल्हा प्रशासन अतिशय तातडीने खबरदारी घेत नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करते. त्याच बरोबर ज्या ठिकाणी अतिवृष्टी आहे, तेथील शाळा व महाविद्यालयांना सुट्टीचा आदेश देखील काढला जातो. मात्र या आदेशामध्ये नेहमी सुधागड तालुक्या ऐवजी पाली तालुका असा उल्लेख आढळून येत आहे. त्यामुळे सुधागड तालुक्यातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.