Raigad Pali Roads: पालीत खड्डे बुजवण्यासाठी नगरपंचायतीची ‘अनोखी शक्कल’; मातीयुक्त खडीमुळे रस्ते चिखलदणी, अपघातांचा धोका वाढला

पालीतील खड्डे बुजवण्यासाठी नगरपंचायतीची मातीयुक्त खडीची शक्कल; रस्ते चिखलदणी बनल्याने भाविक, नागरिक व वाहनचालक त्रस्त
Residents and devotees claim the temporary repair has increased the risk of accidents and made travel more difficult.

Residents and devotees claim the temporary repair has increased the risk of accidents and made travel more difficult.

Sakal

Updated on

​पाली : पाली शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण केली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे भाविक व नागरिक त्रस्त असताना, आता पाली नगरपंचायतीने हे खड्डे भरण्यासाठी लढवलेली 'अनोखी शक्कल' नागरिकांसाठी आणखीनच डोकेदुखी ठरत आहे. प्रशासनाने खड्ड्यांमध्ये चक्क मातीयुक्त खडी टाकल्याने संपूर्ण रस्ते चिखलमय झाले असून, खड्ड्यांपेक्षा या चिखलातून प्रवास करणे भाविक, नागरिक व वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com