कोकण मार्गावर दोन पॅसेंजर गाड्या, एक्सप्रेस गाड्या म्हणून धावणार

राजेश कळंबटे
Friday, 23 October 2020

या संदर्भात त्या-त्या झोनकडून अधिकृत घोषणा अजून व्हायची आहे.

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या दोन पॅसेंजर गाड्या या एक्स्प्रेस गाड्या म्हणून धावणार आहेत. रेल्वेचे नवीन वेळापत्रक लागू होताच या गाड्यांचा दर्जा बदलला जाणार असून यामुळे या दोन गाड्या अधिक वेगवान होणार आहेत.

हेही वाचा - कोकणात मिळणार जीआयच्या ब्रॅण्डिंग साठी अर्थसाह्य -

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर लागू करण्यात आलेली बंधने हळूहळू शिथिल केली जात असताना कमी भारमान तसेच तोट्यात असलेल्या पॅसेंजर गाड्यांना मेल/ एक्स्प्रेस गाड्यांचा दर्जा देण्याचा प्रस्ताव देशभरातील 18 रेल्वे झोनकडून रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला होता. त्यानुसार ज्या पॅसेंजर गाड्यांना मेल/एक्स्प्रेस गाड्यांचा दर्जा देण्यात आला आहे, त्यात कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या रत्नागिरी – मडगाव (50101), मडगाव – रत्नागिरी (50102), दिवा – सावंतवाडी (50105) सावंतवाडी – दिवा (50106) या गाड्यांचा समावेश आहे.

हेही वाचा -  हृदयद्रावक ; अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या एकाच कुटुंबावर काळाचा घाला, तीन ठार तर चार जखमी -

कोकण रेल्वे मार्गावरील दोन पॅसेंजर गाड्या मेल एक्स्प्रेस म्हणून धावणार असल्याने त्यांचे पूर्वीच्या थांब्यांच्या संख्येत घट होणार असून अधिक वेगवान धावू शकणार आहेत. रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू होईल 090987890, तेव्हापासून केला जाणार असल्याचे रेल्वे बोर्डाने 20 ऑक्टोबरला देशातील 18 रेल्वे झोन्सना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, या संदर्भात त्या-त्या झोनकडून अधिकृत घोषणा अजून व्हायची आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: passenger two trains are running as a express train in konkan rail route in ratnagiri