रायगड : पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात बेरोजगारांना दिलासा

लक्ष्मण डुबे 
शनिवार, 25 मे 2019

पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राच्या हद्दित तीन नवीन कारखाने व सेबी केंद्र सुरू झाले आहे. तर बंद  कारखान्यांपैकी काही कारखाने इतर कारखानदारांनी घेऊन सुरू केले आहे. तसेच अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात औद्योगिक विकास सुरू आहे. कारखानदारांना चांगल्या सुविधा देण्याचा एमआयडीसी नेहमीच प्रयत्न करत आहे. 
- राजेंद्र बेलगमवार, उप अभियंता, पाताळगंगा एमआयडीसी 

रसायनी : (रायगड) जागतिक आर्थिक मंदीमुळे पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील एका मागुन एक आसे अनेक कारखाने धडा धड बंद पडले होते. अनेकांवर बेकारीची कु-हाड कोसळली. तर मंदीत तग धरून असलेल्या कारखानदारांनी मंदीवर मात करण्यासाठी कारखान्यांत आधुनिक पध्दतीची यंत्र बसविले तसेच कामगार कपातीसाठी स्वेच्छा निवृत्ति देऊन काढुन टाकले आहे. त्यामुळे परीसरात अजुनच बेकारी वाढली होती. तर मागील काही वर्षापासुन औद्योगिक क्षेत्रात औद्योगिक विकास सावरू लागल्याने बेरोजगारांना दिलासा मिळत आहे. 

दरम्यान मागील काही वर्षात पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील सुमारे दहा कारखाने इतर उद्योजकांनी घेतले आहे. तर तीन नवीन कारखाने व एक संस्था सुरू झाली आहे  प्रकल्पग्रस्त आणि स्थानीकांना नौक-या आणि काहीना उद्योग व्यावसायाचे काम मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. तसेच भविष्यात आजुन बंद  कारखाने इतर उद्योजक घेऊन सुरू करतील आशी शक्याता आहे. 

कारखानदांरी भरभरीटीला असताना रसायनी पाताळगंगा परीसरात एकेकाळी सोन्याचा धुर निघत होता. मात्र वीस वर्षापुर्वी मंदीच्या संकटात होत्याच नव्हत झाले. पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील ओरके पाँलीस्टर, गरूडीया केमिकल्स, टाटा फार्मा लिमिटेड, जयसिंथ डायकेम, सियाराम सिल्क मिल, के पँकेझींग, ज्योति फाँम्स, प्राख्यात प्राव्हेट लिमिटेड, व्हिवीलोन टेक्सटाईल, जर्मन रेमिडाईज लिमिटेड, सँटोजन लिमिटेड, मेटासल्फ प्राव्हेट लिमिटेड, इंन्सिल्को इंडिया लिमिटेड, आदि तसेच क्षेत्रा बाहेरील रामा पेट्रो केमिकल्स, आताश लिमिटेड, ईपिक लिमिटेड, क्रेस्ट पेपर मिल प्राव्हेट लिमिटेड  आदि निम्मे एका मागुन एक कारखाने बंद पडले. अनेक कामगार बेरोजगार झाले स्थानीक इतर उद्योग व्यवसायकडे वळाले तर देशावरील आणि परप्रांतील नागरिकांनी बहुतेकांनी स्थलांतर केले आहे. मात्र मागील आठ दहा वर्षापासुन परिस्थिति हळु हळु बदलु लागली आहे. 

पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील बंद कारखान्यांन पैकी टाटा फार्मा लिमिटेड, जर्मन रेमिडाईज लिमिटेड, इंन्सिल्को इंडिया लिमिटेड, ओरके पाँलीस्टर लिमिटेड कंपनीचा काही भाग,  सियाराम सिल्क मिल प्राव्हेट लिमिटेड, ज्योती फाँम्स प्राव्हेट लिमिटेड, के पँकेझींग प्राव्हेट लिमिटेड, प्रामुख्या प्राव्हेट लिमिटेड,  व्हिवीलोन टेक्सटाईल प्राव्हेट लिमिटेड आदि  कारखाने दुस-या उद्योजाकांनी घेतले आहे. असे सांगण्यात आले. यातील बहुतेक कारखाने सुरू झाले आहे. तसेच या कारखानदारांनी नवीन उत्पादने सुरू केले आहे. तर जयसिंथ डायकेम कारखाना पुन्हा  सुरू झाला आहे. तर औद्योगिक क्षेत्रात क्रिस्टल लिमिटेड, जय प्रेसिजन प्रोडक्स इंडिया प्राव्हेट लिमिटेड कारखाने आणि नँशनल इन्टिटयुट फाँर सिक्युरिटीज मँनेजमेंट हि संस्था सुरू झाले आहे. तर बोरिवली गावाच्या हद्दित एक नोव्होझाईम्स ( NOVOZYMES ) साउथ आशिया प्राव्हेट लिमिटेड हा कारखाना सुरू झाला आहे. तर दुस-या कारखानेचे बांधकाम सुरू आहे. असे सांगण्यात आले. सुरू झालेल्या उद्योगात स्थानिकांना रोजगार मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. 

पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राच्या हद्दित तीन नवीन कारखाने व सेबी केंद्र सुरू झाले आहे. तर बंद  कारखान्यांपैकी काही कारखाने इतर कारखानदारांनी घेऊन सुरू केले आहे. तसेच अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात औद्योगिक विकास सुरू आहे. कारखानदारांना चांगल्या सुविधा देण्याचा एमआयडीसी नेहमीच प्रयत्न करत आहे. 
- राजेंद्र बेलगमवार, उप अभियंता, पाताळगंगा एमआयडीसी 

नॅशनल इन्टिटयुट फाँर सिक्युरिटीयज मँनेजमेंट या संस्थेत आणि जय प्रेसिजन प्रोडक्स प्राव्हेट लिमिटेड कंपनी सुरू झाली आहे, या प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. तसेच काहीना छोट्या  व्यावसायाचा ठेका मिळाला आहे. 
- अजय सावंत, प्रकल्पग्रस्त, वासांबे मोहोपाडा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: patalganga midc in Raigad