पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी

लक्ष्मण डुबे 
Tuesday, 28 May 2019

अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र साधारण 245 उद्योगांना भूखंड आहे. त्यापैकी सुमारे 145 कारखानदारांना बांधकाम पुर्णत्वाचा दाखला देण्यात आला आहे. तर काही भूखंडात बांधकाम सुरू आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा  वाढता ताण लक्षात घेऊन मुख्य रस्ता काँक्रीटचा बांधण्यात येणार आहे. तर इतर चांगल्या सुविधा देण्याचा एमआयडीसीचा प्रयत्न आहे. 
- राजेंद्र बेलगमवार, उप अभियंता, पाताळगंगा एमआयडीसी 

रसायनी : (रायगड) अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात औद्योगिक विकास झपाट्याने होऊ लागला आहे. प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या आणि व्यावसायाचे काम मिळाले आहे, असल्याने समाधान व्यक्त होत आहे. मात्र काही ठिकाणी कारखानदांरानी फक्त शेड व गोदाम बांधुन ठेवल्या असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. ही फसवणुक असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

जागतीक आर्थिक मंदीचा देशातील व राज्यातील कारखानदारीवर वीस पुर्वी मोठा परिणाम झाला. अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात कारखाने सुरू करण्यासाठी छतीस वर्षापुर्वी जमीनी घेण्यात आल्या आहे. मात्र सुरवातीला अनुकल वातावरण नसल्यामुळे आणि त्यानंतर वीस वर्षापुर्वीच्या मंदीमुळे औद्योगिक विकासाला खिळ बसल्याने लवकर कारखाने आलेच नाही. साधारण दहा वर्षापुर्वी काही कारखाने सुरू झाले. त्यानंतर मागील दोन तीन वर्षापासुन औद्योगिक विकास झपाट्याने होऊ लागला आहे. प्रकल्पग्रस्तांना नौक-या आणि काहीना उद्योग व्यावसायाचे काम मिळाले, तसेच काराडे खुर्द, चावणे आणि जांभिवली या ग्रामपंचायतीचा महसुल वाढला असल्याने समाधान व्यक्त होत आहे. 

येथील औद्योगिक क्षेत्रात काही कारखानदारांनी फक्त शेड व गोदाम बांधुन ठेवल्या आहे. त्यामुळे प्रकल्प ग्रस्त व इतर ग्रामस्थ संभ्रमात पडले आहे. या कारखानदारांनी जागा आडकुन ठेवल्या की काय आशी भिती व्यक्त होत आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रील मुख्य रस्त्याच्या पलीकडे पाताळगंगा नदीला लागुन काही बांधकाम व्यावसायीकांनी गृह प्रकल्पाची बांधकाम सुरू केले आहे. औद्योगिक क्षेत्र आणि नदीला लागुन रहिवाशांना राहाण्यासाठी घर बांधणे असुरक्षित आहे असे नागरिकांचे म्हणने आहे. या बांधकाम बाबत कारखानदांर आणि बाजूच्या गावांतील नागरिक अश्चर्य व्यक्त करत आहे.

अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात 245  उद्योग सुरू करण्याचे एमआयडीसीचे नियोजन केले आहे. क्षेत्रातील सध्या इंद्रायणी प्राव्हेट लिमिटेड, अँथोनी गँरेज, टायटन लिमिटेड, किंग इंटरप्राजेस, आठरोटी लिमिटेड, अँथोनी अँटो इंजीनिरींग, इंदुमित्सू लिमिटेड, देवी इंटरप्राजेस, बालीज फँरमोईन, इंटीग्रेट आँइल आणि गँस सर्विसेस, ग्लोबल टेन्कोफेब, औटीकर लिमिटेड, बजाज लिमिटेड, जिंदाल लिमिटेड, इन्दीप लिमिटेड, शिर्के प्राव्हेट लिमिटेड, ग्लास लिमिटेड, ब्रिस्लरी लिमिटेड, कँमलीन लिमिटेड आणि इतर कंपन्या औद्योगिक क्षेत्रात सुरू झाल्या असे सुत्रातून सांगण्यात आले. 

अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र साधारण 245 उद्योगांना भूखंड आहे. त्यापैकी सुमारे 145 कारखानदारांना बांधकाम पुर्णत्वाचा दाखला देण्यात आला आहे. तर काही भूखंडात बांधकाम सुरू आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा  वाढता ताण लक्षात घेऊन मुख्य रस्ता काँक्रीटचा बांधण्यात येणार आहे. तर इतर चांगल्या सुविधा देण्याचा एमआयडीसीचा प्रयत्न आहे. 
- राजेंद्र बेलगमवार, उप अभियंता, पाताळगंगा एमआयडीसी 

अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात कारखाने सुरू करण्यासाठी संघटनेने कधीच विरोध केला नाही. सुरू झालेल्या कारखानदारांनी प्रकल्प ग्रस्तांना कामगार भरतीत सामावुन घेऊन व व्यावसायांचे काम मिळाले पाहिजे. कारखान्यातुन कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. याची काळजी घेतली जावी. पर्यावरण संवर्धनासाठी कारखानदारानी झाडे लावावेत. 
- महासचिव, अतिरिक्त पाताळगंगा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिति 

औद्योगिक क्षेत्रात विकासाच्या नावा खाली ज्या कारखानदांरानी कारखाने उभारण्याठी शेड आणि गोदाम बांधुन जागा आडकुन ठेवल्या आहे की आसा प्रश्न पडतो. मात्र त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना नौक-या व व्यावसायांचे काम मिळाले नाही. हि फसवणुक आहे.  ते कारखानदांर कारखाने  सुरू करत नसतील तर त्या जागा एमआयडीसीने परत घ्याव्यात. आणि इतर कारखाने सुरू करणा-यांना द्याव्यात किंवा मुळ मालक शेतकऱ्यांना परत कराव्यात.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patalganga MIDC in Rasayani