सावंतवाडी शहरात "पे ऍण्ड पार्क'; पालिकेने मागवली निविदा 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

पालिकेच्या महसुलात वाढ होण्याच्या दृष्टीने नगराध्यक्ष संजू परब यांनी अलीकडे पे ऍण्ड पार्कबाबत सुतोवाच केले होते. त्याबाबतची पूर्तता करण्याचे काम आहे.

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - शहरात नो पार्कींगमध्ये लावण्यात येणाऱ्या गाड्या व बाजारपेठेमध्ये होणारी गर्दी लक्षात येथील संत गाडगेबाबा भाजी मंडई बाहेरील मोकळ्या जागेत पालिकेच्या माध्यमातून "पे ऍण्ड पार्क'ची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. याबाबतची निविदा नुकतीच पालिका प्रशासनाकडून मागवण्यात आली आहे. 

पालिकेच्या महसुलात वाढ होण्याच्या दृष्टीने नगराध्यक्ष संजू परब यांनी अलीकडे पे ऍण्ड पार्कबाबत सुतोवाच केले होते. त्याबाबतची पूर्तता करण्याचे काम आहे. शहरामध्ये संत गाडगेबाबा भाजी मंडई समोर असलेल्या मोकळ्या जागेत आणि रस्त्याच्या कडेला विचित्र पद्धतीने गाड्या पार्किंग करण्यात येत असल्याने शहरातील या मुख्य भागात वाहतूक कोंडीची समस्या वारंवार निर्माण होत असते. सणासुदीच्या काळात याठिकाणी वाहनधारकांना तसेच पादचाऱ्यांनाही वाहतूक कोंडीमुळे डोकेदुखी निर्माण होते.

यावर उपाय म्हणून संत गाडगेबाबा भाषण मंडळीच्या बाहेरील मोकळ्या जागेमध्ये पे ऍण्ड पार्किंगची सुविधा निर्माण केल्यास वाहनधारकांमध्येही शिस्त निर्माण होऊन वाहतूक कोंडीची समस्याही मार्गी लागणार असल्याने नगराध्यक्ष परब यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. पालिकेकडून याबाबत निविदा मागविण्यात आल्याने लवकरच ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pay And Park Facility In Sawantwadi City