

The appointment aims to strengthen rural road connectivity and improve farm access for farmers under the Maharashtra Government's flagship scheme.
Sakal
पाली : ग्रामीण भागातील रस्ते विकासाला गती देण्यासाठी आणि शेतकऱ्यांची वाहतूक अधिक सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना' अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या १९१-पेण विधानसभा क्षेत्र स्तरीय समितीच्या सह-अध्यक्षपदी प्रकाश अर्जुन देसाई यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने प्रसिद्ध केला आहे.