सरत्या वर्षात कोकण रेल्वेची कौतुकास्पद कामगिरी;  येणाऱ्या वर्षात अधिक गतिमान होणार

performance of Konkan Railway in the last year
performance of Konkan Railway in the last year
Updated on

रत्नागिरी : सरत्या २०२० या वर्षात कोकण रेल्वेने देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटात अत्यंत महत्वपूर्ण अशी भूमिका बजावली आहे. गेल्या नऊ महिन्यात राष्ट्रीय संकटात श्रमिकांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यापासून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यापर्यंत महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या  कोकण रेल्वेने या वर्षात प्रतिकूल परिस्थिती असतानाही यशाची नवी शिखर हि गाठली आहेत.

मार्चमध्ये देशावर कोरोनाचे संकट आले आणि लॉक डाउनच्या काळात लाखो श्रमिक आपआपल्या घरापासून दूर देशाच्या विविध राज्यात अडकले. कोकण रेल्वेने या काळात महत्वपूर्ण कामगिरी बजावली. सोशल डिस्टंसिंगचे सारे नियम पाळत कोकण रेल्वेने या काळात तब्बल १ लाख १० हजार ६२८ श्रमिकांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची महत्वपूर्ण कामगिरी बजावली. सर्व ठिकाणच्या जिल्हाप्रशासन आणि पोलिस यंत्रणाबरोबर सतत समन्वय ठेवत कोकण रेल्वेच्या सर्व कर्मचारी वर्गाने कोव्हीड योद्धा म्हणून काम करत या श्रमिकांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवले. लॉकडाऊनच्या काळात शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याची भीती होती. कोकण रेल्वेने मालगाडी वाहतुकीच्या माध्यमातून लोकांची जीवनावश्यक वस्तूंची गरज भागवली. ८० श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून १ लाखाहून अधिक लोकांना त्यांच्या घरी पोहोचवणाऱ्या कोकण रेल्वेने २४ स्पेशल पार्सल ट्रेन चालवत या अडचणीच्या काळात जीवनावश्यक वस्तू विविध शहरात पोहोचवत सरकारला मोलाची साथ दिली.


सरत्या वर्षात अनेक अडचणीमुळे कामे ठप्प झाली असताना कोकण रेल्वेने विद्युतीकरण आणि मार्ग दुपदरीकरण च्या कामाचा वेग मंदावू दिला नाही. विद्युतीकरण आणि मार्ग दुपदरीकरण या दोन्ही कामामुळे कोकण रेल्वेचा वेग वाढणार आहे. प्रदूषण मुक्त इको फ्रेंडली प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. ही कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी  सर्व त्या खबरदारी घेत वर्षभरात कोकण रेल्वेने काम केले आहे. यामुळेच रोहा ते रत्नागिरी या मार्गाचे विद्युतीकरणाचे  काम वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे तर रोहा ते वीर दरम्यान मार्ग दुपदरीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. नव्या वर्षांत ही कामे लवकरात लवकर पूर्ण करून अधिक आरामदायी प्रवासासाठी कोकण रेल्वेची टीम अहोरात्र मेहनत घेत आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावरील प्रवास आधी जलद गतीने व्हावा यासाठी कोकण रेल्वेच्या मार्गावर १० नवी स्थानक आणि ८ लूप लाईन्स करणायचे काम आता वेगाने सुरु आहे. यामुळे येणाऱ्या वर्षात कोकण रेल्वेचा प्रवास अधिक गतिमान होणार आहे. 

 भारतीय रेल्वेमध्ये आपल्या विविध नाविन्यपूर्ण प्रयोग आणि संशोधनामुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या कोकण रेल्वेने सरत्या वर्षात कौतुकास्पद कामगिरी केली. यावर्षी कोकण रेल्वेच्या माध्यमातून नेपाळ सरकारला दोन खास  डिझाईन केलेले डेमू प्रदान करण्यात आले. कोकण रेल्वे काश्मीरमध्ये आव्हानात्मक काम करते आहे. उधमपूर-श्रीनगर- बारामुल्ला रेल लिंक च्या या महत्वपूर्ण कामात टी -२ हा महत्वाचा बोगदा पूर्ण करण्यात ऑगस्ट २०२० मध्ये कोकण रेल्वेला यश मिळाले. तर भारत आणि नेपाळला जोडणाऱ्या नव्या रेल्वे मार्गाच्या स्थल निरीक्षणांची जवाबदारी कोकण रेल्वेकडे विश्वासाने सोपवण्यात आली.
 सरत्या वर्षांत संकटाच्या काळात कोकण रेल्वेने कोव्हीड योद्धयांची भूमिका बजावतानाचा राष्ट्र उभारणीच्या कामात प्रतिकूल परिस्थितीत हि महत्वाची भूमिका बजावली आहे. कोकण रेल्वेची टीम अहोरात्र घेत असलेल्या मेहनतीमुळे कोकण रेल्वेच्या मार्गावरील प्रवास येणाऱ्या वर्षात अधिक वेगवान आणि प्रदूषणमुक्त होणार आहे.

 
करोनाचाचा प्रादुर्भाव ऐन भरात असताना कोकण रेल्वेची सुरक्षात्मक कामे करण्यासाठी तसेच अनेक श्रमिक स्पेशल गाड्यांच्या नियोजनासाठी जिल्हा प्रशासनाची वेळोवेळी अत्यंत मोलाची मदत झाली. हे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी विशेष करून नमूद केले.

 सर्वसाधारणपणे रेल्वेचे आर्थिक गणित असे असते की सुमारे 70 टक्के आमदानि  माल वाहतुकीतून होते तर 30 टक्के आमदानी ही पॅसेंजर वाहतुकीमधून होते. परंतु कोकण रेल्वेवर हे चित्र उलटे आहे. कोकण रेल्वेची 70 टक्क्याहून जास्त आमदानी ही पॅसेंजर वाहतुकीतून होते. पण पॅसेंजर वाहतूक सुमारे सहा महिने जवळपास पूर्णपणे बंद असल्याने कोकण रेल्वेवर प्रचंड आर्थिक ताण पडला. असे असून देखील आपल्या व्यावसायिक व नैतिक निष्ठांना जागून कोकण रेल्वेने कर्मचाऱ्यांचे पगार, लहान ठेकेदारांना मिळणारा परतावा जवळपास शंभर टक्के मिळेल  याची निश्चिती केली. केवळ इतकेच नव्हे तर चहाचे स्टॉल फूड स्टॉल अशा कोकण रेल्वे वर अवलंबून असणाऱ्या व्यवसायिकांच्या अडचणी समजून घेऊन आवश्यक त्या सवलती देखील प्रदान केल्या.

असे म्हणतात की संकटातून मार्ग शोधणे हेच व्यवस्थापन कौशल्य असते. या उक्तीस जागून जेव्हा प्रवासी वाहतूक पूर्णपणे रोडावली होती त्यावेळी मालवाहतुकीचे अन्य पर्याय शोधण्यावर कोकण रेल्वेच्या व्यवस्थापनाने विशेष लक्ष केंद्रित केले. सरत्या वर्षात कोकण रेल्वेने सुमारे दीड लाख टन एवढ्या खताची वाहतूक नव्याने केली. यात प्रत्येक वर्षागणिक अधिकाधिक वृद्धी होणे अपेक्षित आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com