सुप्रसिद्ध फोटोग्राफर संजिव साळवी यांचे निधन : कोरोनाची झाली होती लागण

photographer sanjay salvi death because corona infection in ratnagiri
photographer sanjay salvi death because corona infection in ratnagiri
Updated on

रत्नागिरी : रत्नागिरीतील सुप्रसिद्ध फोटोग्राफर संजिव साळवी (वय 48, रत्नागिरी) यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर शासकीय कोव्हिड रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांंच्या प्रकृतीतही चांगली सुधारणा होत होती. काल त्यांना जनरल वॉर्डमध्ये हलविण्यात आले होते. प्रकृती सुधारत असल्याचे संदेश (मेसेज) त्यांच्या नातेवाईकांकडुन मित्रमंडळीला मिळत होते.

मात्र आज सकाळी साडे अकरावाजण्याच्या सुमारास  अचानक त्यांची प्रकृती खालवली आणि त्यांचे निधन झाले. संजू साळवी यांनी  फोटोग्राफी क्षेत्रात नाव कमावले होते. रत्नागिरी बरोबर  गोव्यातही त्यांचे फोटोग्राफी क्षेत्रात मोठे काम सुरू होते. मॉडेलिंग फोटोग्राफी क्षेत्रातही त्यांचे नाव होते. कॉलेज काळात त्यांनी अनेक ऑर्केस्ट्रामधून मिमिक्री व गायन केले होते. त्याच्यातील अभिनय पुढे आला होता.

कोरोनाची झाली होती लागण; घटनेने हळहळ​

काही चित्रपट आणि मालिकांमध्ये त्याने भुमिका केली होती. आज त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच सर्वांना मोठा धक्का बसला संजीव साळवी यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रत्नागिरीतील उमद्या छायाचित्रकाराचे निधन झाल्याने या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. फोटोग्राफर संघटनेच्यावतीने त्यांना आदरांजली वाहिन्यात आली.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan primary school teacher transfer protest
When will Ratnagiri Airport start commercial flights?
Ratnagiri Buddha Vihar development project controversy
Ratnagiri Mumbai Goa Highway accident
Marathi News Esakal
www.esakal.com