गावकऱ्यांनीच दिले रानडुक्कराला जीवनदान ; विहीरीतून बाहेर काढण्यात आले यश

piggy drawn in well with the help of people tapped from well in mandangad ratnagiri
piggy drawn in well with the help of people tapped from well in mandangad ratnagiri

मंडणगड (रत्नागिरी) : बुधवारी पहाटे वेळास येथे विहीरीत पडलेल्या रनडुक्करास गावातील ग्रामस्थांनी वनविभाग आणि पोलीसांच्या मदतीने जीवनदान दिले. वनविभागाच्या पिंजऱ्यात पकडण्यात आलेले रानडुक्कर साखरी येथील जंगलात नेवून सोडण्यात आल्याची माहीती मिळाली आहे. 

या संदर्भात वेळास येथील ग्रामस्थ हेरंब दांडेकर यांच्याकडून मिळालेल्या माहीतीनुसार, दांडेकर व दिपक वैद्य यांच्या सामाईक विहीरीत बुधवार पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमार रानडुक्कर पडले असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी गावातील अन्य ग्रामस्थ तसेच वनविभाग व पोलीस खात्यास विहीरीत डुक्कर पडले असल्याची माहीती दिली. यानंतर डुकरास विहीरीतून बाहेर काढण्यासाठी दापोली वनविभागातून पिंजरा आणण्यात आला. वनरक्षक एस.आर. गायकवाड, ए.आर. मंत्रे, बाणकोट सागरी पोलीस स्थानकाचे ए. एस. आय. आळे, वनरक्षक ए.बी. पाटील, सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या सहकार्याने डुकर पकडण्यासाठी वेळास येथे आणलेला पिंजरा दोरीच्या मदतीने विहीरीत सोडण्यात आला.

त्यानंतर पाण्यात पोहत असलेले रानडुक्कर काही क्षणात या पिजंऱ्यात शिरले. पिंजरा विहीरीतून वर काढण्यात आला. डुक्कर पिंजऱ्यात बंदिस्त झाल्याने घटनास्थळी जमलेल्या सर्वांनीची सुटकेचा श्वास सोडला. यानंतर पिंजरा गाडीत भरुन तो साखरी येथील जंगलात नेण्यात आला. तेथे पिंजऱ्यातून डुक्करास बाहेर सोडण्यात येणार असल्याची सांगण्यात आले आहे. रान डुक्करास विहीरीतून बाहेर काढण्यासाठी मंडणगड व दापोली येथील वनविभागांनी दाखविलेल्या तत्परतेचे कौतूक केले जात आहे.

संपादन - स्नेहल कदम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com