Pind Daan At Raigad Fort : पिंडदानप्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pind daan at raigad fort mahad crime letter to cm eknath shinde

Pind Daan At Raigad Fort : पिंडदानप्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्र

महाड : रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी पिंडदान होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा प्रकार या वेळी उपस्थित असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रोखला. या प्रकाराबाबत शिवप्रेमी व संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला असून अशा प्रकारच्या विधींना अटकाव केला जावा, अशी मागणी संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका पत्रान्वये केली आहे.

शिवसमाधी स्थळी पिंडदान केले जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने रायगडची सुरक्षाही धोक्यात आली आहे. गडावर सातत्याने होत असणाऱ्या विविध प्रकारच्या विधींमुळे शिवप्रेमी संतापले आहेत.

रायगडावर श्राद्ध अथवा पिंडदान करणे ही संकल्पना व पद्धत चुकीची आहे. रायगडावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार घालायचा असेल तरीही पुरातत्त्व विभागाची परवानगी लागते, मग एवढा मोठा प्रकार होईपर्यंत यंत्रणा काय करत होती. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जावी.

- सुरेश पवार, अध्यक्ष, कोकणकडा मित्रमंडळ