esakal | प्लास्टिक फेकून देताय मग ही बातमी वाचाच
sakal

बोलून बातमी शोधा

Plastic bishi on Sunday in Chiplun ratnagiri marathi news

कोकणात अनोख्या पद्धतीने  भिशी घेतली जातेय  यामध्ये तुम्हाला पैसे न भरता मिळणार आहे 1000 रुपयांची साडी आणि भरपूर बक्षिसे.ही आहे. प्लास्टिक भिशी नेमकी ही  आहे तरी काय घ्या जाणून.    

प्लास्टिक फेकून देताय मग ही बातमी वाचाच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : भिशी म्हटलं की पैसे साठवण्याचा एक संच. अनेक गृहिणी दिवाळीच्या तयारीसाठी, दसऱ्याच्या  तयारीसाठी, अथवा गावातील यात्रा जत्रांच्या तयारीसाठी अनेक ठिकाणी भिशी टाकतात. मात्र कोकणात अनोख्या पद्धतीने  भिशी घेतली जातेय  यामध्ये तुम्हाला पैसे न भरता मिळणार आहे 1000 रुपयांची साडी आणि भरपूर बक्षिसे.ही आहे. प्लास्टिक भिशी नेमकी ही  आहे तरी काय घ्या जाणून.                                                                                                                                          सह्याद्री निसर्गमित्र चिपळूण, डाऊ केमिकल इंटरनॅशनल व चिपळूण पालिका यांच्या सहकार्याने चिपळुणात प्लास्टिक भिशीचे आयोजन केले आहे. पहिली भिशी रविवारी (ता. ७) ब्राह्मण साहाय्यक संघाच्या सभागृहातून दुपारी तीन वाजता चालू होणार आहे. कार्यक्रमात दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत सर्व सहभागींकडून प्लास्टिक जमा करून घेतले जाईल. या प्लास्टिकमध्ये घरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या साफ केलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, कॅरीबॅग, लहान मुलांची मोडकी खेळणी, मोडकी खुर्ची, पाण्याच्या बाटल्या इत्यादी कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक घेतले जाईल. या भिशीमध्ये कोणीही व्यक्ती नावनोंदणीशिवाय थेट एक किलो प्लास्टिक घेऊन सहभागी होऊ शकते.

प्लास्टिक घेतानाच प्रत्येक महिलेला प्रति १ किलो प्लास्टिकमागे दहा रुपये रोख आणि एक कुपन दिले जाईल. पाच वाजता सर्व महिलांसमोर सोडत काढली जाईल. प्रथम क्रमांकाला एक हजार रुपयांची साडी आणि दोन उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील. कचरा प्रश्‍न सोडवण्यासाठी सह्याद्री निसर्गमित्रने गेल्या वर्षीपासून चिपळूणमध्ये काम चालू केले आहे. 

किरण विहार गृहसंकुल ही सोसायटी गेल्या वर्षी कचरामुक्त केल्यावर त्यांना घरपट्टीमध्ये पाच टक्के सवलत पालिकेकडून मिळाली आहे. स्वरविहार गृह संकुल या १५६ सदनिकांच्या सोसायटीत हा प्रकल्प चालू करण्यात आला. यावर्षी शंभर वैयक्तिक घरे तसेच दहा सोसायट्या कचरामुक्त करण्याचा संकल्प आहे. आत्तापर्यंत  ५३ वैयक्तिक घरात कम्पोस्टिंग चालू झाले आहे. तीन सोसायट्यांमध्ये काम चालू होत आहे. 

शहरात घनकचरा व्यवस्थापनासाठी अपार्टमेंटमधील नागरिकांनी पुढाकार घेण्याची आवश्‍यकता आहे. अपार्टमेंटमधील ओल्या व सुक्‍या कचऱ्याची विल्हेवाट तिथेच लागल्यास पालिकेवर मोठा ताण येणार नाही. घनकचरा व्यवस्थापनातून सेंद्रिय खताचीदेखील निर्मिती होईल. 
- सौ. मनाली वरवाटकर, स्वरविहार गृहसंकुल, चिपळूण


शहरात घनचकरा व्यवस्थापनाची मोठी समस्या आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिका प्रयत्नशील असली तरी योग्यरीत्या घनकचऱ्याचे नियोजन होत नाही. गृहसंकुलातच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारल्यास पालिकेवर घनकचरा व्यवस्थापनाचा मोठा ताण पडणार नाही. गृहसंकुल परिसरात असे प्रकल्प मार्गी लागल्यास घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लागून शहर अधिक स्वच्छ आणि सुंदर राहण्यास मदत होईल.
- सौ. राधिका पाथरे, किरण विहार संकुल, चिपळूण

संपादन- अर्चना बनगे
 

loading image