कोकण रेल्वेतील डाल वड्यात प्लॅस्टिकचे तुकडे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

रत्नागिरी - कोकण रेल्वेतील विक्रेत्याकडून खाल्लेल्या डाल वड्यातील प्लॅस्टिकचे दोरे पोटात गेल्यानंतर एका दोन वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडल्याचा प्रकार पुढे आला आहे. यासंदर्भात प्रवासी सचिन शिंदे यांनी आयआरसीटीकडे तक्रार करून त्याची गंभीर दखल घेण्यात आलेली नाही. हा प्रकार खेड येथील संबंधित ठेकेदाराला कळविण्यात आला होता; परंतु त्याच्याकडूनही उडवाउडवीची उत्तर दिले गेल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. 

रत्नागिरी पोलिस दलात कार्यरत असलेले सचिन किसन शिंदे हे 15 जुलैला पत्नी व दोन वर्षाच्या मुलासोबत मत्स्यगंधा एक्‍स्प्रेसने रत्नागिरीला येत असताना हा प्रकार घडला होता. लहान मुलाने हट्ट केला, म्हणून खेड स्टेशन येथे त्यांनी रेल्वेतील विक्रेत्याकडून 25 रुपयांना डाल वडा घेतला. हा वडा खाताना लहान मुलाला जोरात ठसका लागला व त्याच्या घशात प्लॅस्टिकसारखे काहीतरी आढळले. शिंदे यांनी तपासून पाहिल्यानंतर उरलेल्या अर्ध्या वड्यातही प्लॅस्टिकचे तुकडे होते. ही बाब त्यांनी तत्काळ खेड स्थानकात उतरून विक्रेत्याला दाखवली; मात्र हे प्लॅस्टिक नसून लसूण असल्याचे त्याने सांगितले. तिथे जमलेल्या प्रवाशांनी आवाज चढविल्यावर रेल्वेत खानपान विक्रीचा ठेका घेणाऱ्याला बोलावण्यात आले. त्याच्याकडूनही उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. त्यामुळे तो विषय पुढे सरकलाच नाही. 
 
तीन दिवसांनी मुलाची प्रकृती सुधारली 
रत्नागिरीत आल्यानंतर शिंदे यांच्या मुलाला त्रास सुरू झाला. जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार केल्यानंतर तीन दिवसांनी मुलाची प्रकृती सुधारली. त्या मुलाच्या उलटीमधूनही प्लॅस्टिक तुकडे असल्याचे शिंदे यांनी सांगितले. यासंदर्भात सचिन शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाच्या आयआरसीटीकडे तक्रार नोंदवली होती. पण त्याची गंभीर दखल घेण्यात आली नसल्याचे शिंदे यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plastic pieces in Dalwada in Konkan Railway