

Plastic Scrap Fire
esakal
नागाव: प्लास्टिक स्क्रॅप गोदामांसाठी अग्निप्रतिबंधक आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी सक्तीची करावी. तसेच ज्या हद्दीत ही गोदामे आहेत, त्या ग्रामपंचायतींनी वेळोवेळी सर्वेक्षण करून अहवाल तयार करावा, अशी मागणी होत आहे. नागाव (ता. हातकणंगले) येथील प्लास्टिकच्या दोन गोदामांना लागलेली आग ४८ तासांनंतरही धुमसत आहे.