प्लास्टिक कचऱ्यातून मिळणार उत्पन्न ; 'निसर्ग मित्र'ची ऑफर

plastic waste source of production in chiplun for citizen
plastic waste source of production in chiplun for citizen

चिपळूण (रत्नागिरी) : शहरातील प्लास्टिकचा कचरा गोळा करण्याचे काम येथील निसर्ग मित्र संस्थेने केले आहे. या चळवळीत नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी संस्थेला प्लास्टिक देणाऱ्यांना पैसेही दिले जाणार आहेत. त्यामुळे दैनंदिन वापरातील प्लास्टिकचा कचरा शहरातील नागरिकांना उत्पन्न मिळवून देणारा ठरणार आहे. 

प्लास्टिकच्या वापरावर बंदी आणण्याची घोषणा वेळोवेळी केले जाते. परंतु, यावर कोणताही ठोस व निर्धारपूर्वक निर्णय अद्याप झालेला नाही. राज्य सरकारकडून फतवा आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेकडून प्लास्टिक वापरणारे आणि बाळगणारे यांच्यावर कारवाई केली जाते. मात्र, त्यात सातत्य नसते. अलीकडच्या काळात प्लास्टिकच्या वापरात वाढ झाल्यामुळे कचऱ्याच्या घटकांमध्ये मोठे बदल झाले.

प्लास्टिकचा पुनर्वापर होऊ शकतो, हे अनेकांना माहित आहे. पण पुनर्वापराच्या व्यवस्थेपर्यंत कसे पोहचायचे, हे लोकानांच माहित नसल्यामुळे आतापर्यंत प्लास्टिकचा कचरा जाळला जात होता. सह्याद्री निसर्ग मित्र संस्था शहरातून प्लास्टिकचा कचरा गोळा करून तो पुनर्वापरासाठी कंपनीकडे देणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेकडून कचरा देणाऱ्यांना पैसे दिले जाणार आहेत. यासाठी संस्थेने ऑनलाईन प्लास्टिक भिशी सुरू केली आहे. त्यात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी अधिक भर दिला आहे. 

"नागरिकांकडून 5 रुपये प्रति किलो दराने प्लास्टिक विकत घेतले जाईल. त्याशिवाय त्यांना एक कुपनही दिले जाईल. स्वच्छ प्लास्टिकचा कचरा देतील, त्यांना 100 रुपयांपासून 1 हजार रुपयापर्यंतची बक्षिसे दिली जाणार आहेत."

- भाऊ काटदरे, संचालक सह्याद्री निसर्ग मित्र संस्था चिपळूण 

दररोज 23 टन कचरा गोळा 

चिपळूण शहरातील कचरा उचलण्यासाठी पालिकेच्या घंटागाड्या शहरात फिरतात. दररोज 23 टन कचरा गोळा केला जातो. धामणवने येथील कचरा प्रकल्पात सुका कचरा चक्क जाळला जातो. एकूण कचऱ्यापैकी सुमारे 25 टक्के कचरा जमवलाही जात नाही. त्यातून पाण्याचे प्रदूषण होते, गटारे तुंबतात, मातीची प्रत बिघडते. प्लास्टिक-प्रदूषण अतिशय व्यापक परिणाम करते. हे माहीत असताना नागरिकांकडून प्लास्टिकचा वापर कमी होत नाही. 

दृष्टिक्षेपात

  • शहरातून प्लास्टिकचा कचरा गोळा करणार 
  • तो पुनर्वापरासाठी कंपनीकडे देणार 
  • संस्थेकडून कचरा देणाऱ्यांना पैसे देणार 
  • ऑनलाईन प्लास्टिक भिशी केली सुरू 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com