काय रे बाबा अलिबागहून आलास का? उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

- विनोद सर्वच समाजघटकांवर, मनावर घेऊ नका - उच्चन्यायालय

- "काय रे अलिबागहून आलास का" असे म्हणत अलिबागकरांना हिणवले जाते, अशी तक्रार करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने आज फेटाळली.

मुंबई : "काय रे अलिबागहून आलास का" असे म्हणत अलिबागकरांना हिणवले जाते, अशी तक्रार करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने आज फेटाळली. विनोद सर्वच समुदायांवर होत असतात, ते मनावर घेऊ नका, त्याचा आनंद घ्या, असे ही न्यायालयाने याचिका दाराला सांगितले.

सिनेमामध्ये अलिबागबाबत केल्या जाणाऱ्या या डायलॉग वर राज्य सरकार आणि सेन्सॉर मंडळाने मनाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी राजेंद्र ठाकूर यांनी जनहित याचिकेद्वारे केली होती. मात्र विनाद सर्वच समाज घटकांवर होत असतात. त्याचा आनंद घ्या, असे न्यायालय म्हणाले.

सिनेमा, नाटक, मालिका यामध्ये अनेकदा वापरलेला, "काय रे अलिबागवरून आला आहेस का?" हा डायलॉग म्हणजे, "तू अडाणी आहेस का?" या आशयाचा वाटतो. अलिबाग महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं पर्यटनस्थळ असून ऐतिहासिक महत्त्व आहे. पण या डायलॉग मुळे येथील स्थळांची बदनामी होते, असे याचिकादाराचे म्हणणे आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a plea rejected From Mumbai High Court for taliking About Alibuag