कृषी योजनांचा (Agricultural Scheme) लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना (Farmers) मिळावा, यासाठी केंद्र आणि राज्याने ही योजना अमलात आणली.
सिंधुदुर्गनगरी : पीएम किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत (PM Kisan Credit Card Scheme) जिल्ह्यात २५ हजार २१६ लाभार्थ्यांना ऑनलाईन क्रेडिट कार्ड प्राप्त झाली आहेत. अजूनही १५ हजारांहून अधिक लाभार्थी या योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. काही लाभार्थ्यांपर्यंत ही योजना अद्यापही पोहोचली नसल्याचे स्पष्ट होत आहे.