नारायण राणे भाजपला एक नंबरचा पक्ष करतील; नितेश राणे

Nilesh-Nitesh-Rane
Nilesh-Nitesh-Rane
Updated on

सिंधुदुर्ग: केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन नारायण राणे (Narayan Rane) यांचे देशातील महत्त्व भाजपने वाढवले आहे. यापुढील काळात राज्यात एक नंबरचा पक्ष करण्यासाठी त्यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरेल. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रतीक्रिया दिली. नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर दिल्लीतील निवासस्थानी राणे यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.राणे कुटुंबीयांसाठी आजचा दिवस हा सुवर्णक्षण असल्याचे ते म्हणाले.

निलेश राणे म्हणाले, जेव्हा जेव्हा राणे साहेबांच्या अंगावर जबाबदारी आली तेव्हा त्या पदाला शंभर टक्के न्याय देण्याचं काम नारायण राणे यांनी केले आहे. ज्यावेळी त्यांना पद मिळाले त्यावेळी त्यांनी अत्यंत गांभीर्याने त्याच्यांकडे लक्ष दिले. मंत्रीपद ही एक मोठी जबाबदारी आहे. वेगवेगळ्या स्तरावर देशाची सेवा करण्याची संधी या निमित्ताने मिळत आहे. यावेळी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर त्यांनी टोला लगावला. ज्यांना तुम्ही शत्रू समजता त्यांना मी किंमत ही देत नाही असे ते म्हणाले. यावेळी नितेश राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं सह राज्यातील सर्व नेते मंडळींचे आभार मानले.

नितेश राणे म्हणाले, नारायण राणे यांची प्रशासनावर मोठी पकड आहे. काँग्रेसने जे 6 वर्षात दिले नाही ते भाजपने गेले दीड वर्षांमध्ये दिले आहे. यावरूनच सामान्य कार्यकर्त्याला भाजपमध्ये किती महत्त्व दिलं जातं हे स्पष्ट होते. भाजपला एक नंबरचा पक्ष करण्यासाठी नारायण राणे यांची ताकद या पुढील काळात नक्कीच मोठी ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

What Happened That Night? Father-Son Dead, Wife Battles for Life in Mapusa
353rd Shivrajyabhishek Day celebration held at Raigad Fort with Eknath Shinde
Marleshwar Temple waterfall safety advisory
Teacher Eligibility Test
Marathi News Esakal
www.esakal.com