स्थानिकांना मारहाण करुन पळणाऱ्या दहा ते बारा पर्यटकांना पोलिसांनी पकडले

स्थानिकांना मारहाण करुन पळणाऱ्या दहा ते बारा पर्यटकांना पोलिसांनी पकडले

सातारा येथील पंधरा पर्यटक चार खाजगी गाड्या घेऊन मौजमजा करण्यासाठी आज गोवा येथे आले होते.

- रोहन गावडे

सावंतवाडी - गोवा-पेडणे येथे स्थानिकांना मारहाण करुन पळणाऱ्या सातारा येथील दहा ते बारा पर्यटकांना दाणोली-बावळाट तिठयावर जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस व सावंतवाडी पोलिसांनी आज सापळा रचून पकडले व त्यांना साय गोवा पेडणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हा मारहाणीचा प्रकार आज सायंकाळी पेडणे येथे साडे तीनच्या सुमारास घडला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा येथील पंधरा पर्यटक चार खाजगी गाड्या घेऊन मौजमजा करण्यासाठी आज गोवा येथे आले होते. दिवसभर मौजमजा केल्यानंतर ते माघारी परतत होते. पेडणे येथे आले असता त्यांनी रस्त्यावर गाडी पार्क करून मद्यप्राशन करण्यास सुरुवात केली. यावेळी स्थानिक पेडणे ग्रामस्थानी त्यांना अडवून स्थानिक ठिकाणी मद्यप्राशन करण्यास मज्जाव केला. त्यानंतर वाहने देखील व्यवस्थित पार्क करण्यास सांगितले; मात्र यावरून स्थानिक ग्रामस्थ तसेच त्या पर्यटकांत शाब्दिक बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे पर्यावसन हाणामारीत झाले. दोन्ही गटाकडून एकमेकांना मारहाण करण्यात आली. शिवाय गाड्यांवर दगडफेक करून नुकसानही करण्यात आले. मारहाण करून त्या पर्यटकांनी आपल्या गाड्या घेऊन तेथून पलायन केले. या घटनेची माहिती पेडणे ग्रामस्थांनी पेडणे पोलिसांना दिली. लागलीच पेडणे पोलिसांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांना संपर्क साधला व घटनेची माहिती दिली. त्यानंतर याबाबत सावंतवाडी पोलिसांनाही कल्पना देण्यात आली.

स्थानिकांना मारहाण करुन पळणाऱ्या दहा ते बारा पर्यटकांना पोलिसांनी पकडले
नैराश्य आल्याने पत्नीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न

पोलीस नियंत्रण कक्षाकडून जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांना ही माहिती देण्यात आली. त्यावरून पलयानाच्या प्रयत्नात असलेल्या सातारा येथील त्या दहा ते तेरा पर्यटकांच्या एका गटाला दाणोली-बावळाट येथे तिठ्यावर पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत काही पर्यटक निसटून जाण्यात यशस्वी ठरले; मात्र बारा पर्यटकांना त्यांच्या गाड्यांसह येथील पोलिस ठाण्यात आणण्यात आले. हा गुन्हा पेडणे पोलीस ठाण्यात घडल्यामुळे त्याची नोंद न करता त्या सर्व पर्यटकांना पेडणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस व सावंतवाडी पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. यातील संबंधित पर्यटकांच्या गाड्यांवर दगडफेक झाल्यामुळे नुकसान झाले तर काहींना किरकोळ दुखापत देखील झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com