साखरपा : मिऱ्या-नागपूर महामार्गामुळे (Mirya-Nagpur Highway) आंबाघाट हा वाहतुकीस यंदाही अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे. ठिकठिकाणी साचलेला चिखल, खड्ड्यांमुळे चाळण झालेला रस्ता आणि खोदकामामुळे दरड कोसळण्याची भीती यामुळे महामार्गावरून प्रवास हा धोकादायक ठरणार आहे.