कुडाळ : शिंदे गटामधील दोन गटात असलेल्या अंतर्गत वादामुळेच चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर या तरुणाच्या हत्येचा दोन वर्षांनंतर उलगडा झाला आहे. यातील संशयित सिद्धेश शिरसाट हा आमचा कार्यकर्ता नव्हता किंवा तो दहा वर्षांत कधीही शाखेत आला नाही. माझ्यासोबत त्याचा कधीही वावर नव्हता किंवा माझ्यासोबत त्याचा एकही फोटो नाही. तेव्हा तो सक्रियही नव्हता. खुनाच्या घटनेनंतर तो सक्रिय झाला. गेल्या दीड वर्षांत आमदार नीलेश राणेंसोबत (Nilesh Rane) त्याचा वावर होता. मग त्याला पाठीशी घालणारा ‘आका’ कोण? हे लवकरच जनतेला कळेल, असे ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी सांगितले.