'राणेंच्या माध्यमातून आता संपूर्ण कोकणचा कायापालट होणार'

'राणेंच्या माध्यमातून आता संपूर्ण कोकणचा कायापालट होणार'
Summary

नाणार येथील रिफायनरीसह अनेक उद्योगांची उभारणी पुढील काळात होणार आहे. त्‍या माध्यमातून लाखो रोजगार संधी निर्माण होतील.

कणकवली : केंद्राच्या कॅबिनेटमध्ये नारायण राणे (narayan rane) यांना स्थान मिळाल्‍याने आता कोकणच्या विकासाचा संपूर्ण बॅकलॉक (konkan development) भरून निघणार आहे. नाणार येथील रिफायनरीसह अनेक उद्योगांची उभारणी पुढील काळात होणार आहे. त्‍या माध्यमातून लाखो रोजगार संधी निर्माण होतील. केंद्रीय मंत्री झाल्‍यानंतर प्रथमच सिंधुदुर्गात (sindhudrg district) येणाऱ्या राणेंचे न भूतो न भविष्यती, असे स्वागत भाजपचे कार्यकर्ते करणार असल्‍याची माहिती भाजप प्रदेश चिटणीस आणि राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचे संयोजक प्रमोद जठार (pramod jathar) यांनी दिली.

जन आशीर्वाद यात्रेच्या अनुषंगाने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची आढावा बैठक येथील प्रहार भवनमध्ये झाली. त्‍यानंतर याबाबतची माहिती जठार यांनी दिली. त्‍यांच्यासोबत आमदार नीतेश राणे, भाजप जिल्‍हाध्यक्ष राजन तेली, जिल्‍हा बँक संचालक अतुल काळसेकर, जिल्‍हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, ॲड. अजित गोगटे आदी उपस्थित होते.

'राणेंच्या माध्यमातून आता संपूर्ण कोकणचा कायापालट होणार'
भूकंपाने हैती हादरले, 1297 जणांचा मृत्यू

जठार म्‍हणाले, "राणेंच्या माध्यमातून आता कोकणचा संपूर्ण कायापालट होणार आहे. केंद्रीयमंत्री झाल्‍यानंतर ते प्रथमच कोकण आणि सिंधुदुर्गात येणार असल्‍याने त्‍यांचे प्रत्‍येक जिल्ह्यात, तालुक्‍यात भव्य स्वागत होणार आहे. या यात्रेत राणेंची कुठेही जाहीर सभा होणार नाही. तर जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी ते येत आहेत. या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्‍या सात वर्षात केलेली दिमाखदार कामगिरी जनतेपर्यंत पोचविण्याचाही प्रयत्‍न आहे. जन आशीर्वाद यात्रेत राणे चिपळूण, खारेपाटण येथील पूरग्रस्तांशी राणे संवाद साधणार आहेत. तसेच विविध संस्था, प्रतिनिधी, सर्वसामान्य नागरिक यांची निवेदने देखील राणे या यात्रेत स्वीकारणार आहेत. मराठा, मुस्लीम, ओबीसी, बुद्धीष्‍ट आदी सर्व समाज आणि संघटनांच्यावतीन राणेंचे स्वागत होणार आहे."

राणेंचा दौरा

केंद्रीय मंत्री नारायण राणे २५ ऑगस्टला सायंकाळी ४ वाजता खारेपाटण येथे येतील. तेथून तळेरे, नाधवडे, वैभववाडी, फोंडाघाट मार्गे ते कणकवलीत दाखल होणार आहेत. २६ ला ते सिंधुदुर्गातील सर्व तालुक्‍यांचा दौरा करतील तर २७ लाही त्‍यांचा मुक्‍काम सिंधुदुर्गात राहावा, यासाठी भाजपची मंडळी प्रयत्‍नशील असल्‍याची माहिती श्री. जठार यांनी दिली.

'राणेंच्या माध्यमातून आता संपूर्ण कोकणचा कायापालट होणार'
Afghanistan: सत्तासंघर्षात सर्वसामान्यांचे हाल, पाहा भयावह परिस्थिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com