esakal | 100 कांद्यांच्या माळेचा प्रशांत परब यांचा कांदा लागवडीचा यशस्वी प्रयोग
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

100 कांद्यांच्या माळेचा प्रशांत परब यांचा कांदा लागवडीचा यशस्वी प्रयोग

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : बांबुळी (ता. कुडाळ) येथील प्रशांत अंकुश परब या प्रयोगीशील शेतकऱ्याने सलग तिसऱ्यावर्षी कांद्याचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. पाच गुंठ्यांतून त्यांनी २ हजार क्विंटल उत्पादन घेतले असून किलो आणि शिखळ पद्धतीने स्थानिक पातळीवर विक्री सुरू आहे. पीक पद्धतीत त्यांनी केलेला बदल त्यांना अधिक उत्पादन देत आहे.

जिल्ह्यात आंबा, काजू, भात, नाचणी, नारळ, सुपारी, कोकम यासह हंगामी भोपळा, कलिंगड अशी पिके घेतात; परंतु अलीकडे जिल्ह्यातील काही शेतकरी स्ट्राबेरीसारखी पिके देखील घेत आहे. काही शेतकरी पीक पद्धतीत बदल करून उत्पन्न वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत आहेत. असाच प्रयोग कुडाळ तालुक्‍यातील प्रशांत अंकुश परब या ४० वर्षीय शेतकऱ्याने केला आहे. सलग तिसऱ्या वर्षी या शेतकऱ्याने पाच गुंठे जमिनीत कांदा लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे.

यावर्षी त्यांनी डिसेंबरमध्ये कांदा बियाण्याची पेरणी केली. स्वतःचा कांदा रोपे तयार केल्यामुळे रोपनिर्मितीचा खर्च कमी आला. या रोपांची त्यांनी २० जानेवारीला पाच गुंठ्यांत लागवड केली. मार्च अखेरला कांदा काढणीला आला. सरासरी प्रतिगुंठा चार ते पाच क्विंटला कांदा उत्पादन त्यांनी घेतले आहे. याशिवाय त्यांनी तयार केलेल्या कांदा रोपांना देखील शेतकऱ्यांकडून मागणी वाढली आहे. ज्यादा तयार केलेली रोपे त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांना माफक दरात विक्री केली. त्यातून रोप निर्मितीचा खर्च देखील वजा झाला. सरासरी दोन हजार २ हजार दोनशे िक्वंटल कांदा उत्पादन झाले असून स्थानिक ग्राहकांकडून सध्या कांदा खरेदी केला जात आहे. किलो आणि शिखळ पद्धतीने कांदा विक्री सुरू आहे. १०० कांद्यांची माळ तयार करून ती २५० रुपयांना विक्री केली जात आहे.

ग्राहकही गावठी कांदा म्हणून खरेदीस पसंती देत आहेत. सलग तीन वर्षे यशस्वी लागवड केल्यानंतर आता कांदा पिकातील बारकावे परब यांच्या लक्षात आले आहेत. त्यामुळे भविष्यात कांदा पिकाखालील क्षेत्र वाढविणार आहेत. कांदा पिकाच्या माध्यमातून परब यांनी जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रात वेगळी वाट चोखाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. काही ठराविक पिकांवर अवलंबून न राहता पीक पध्दतीत बदल करण्याचा अनेक शेतकरी प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांदा आयात केला जातो; परंतु जिल्हयात कांदा उत्पादित होऊ शकतो, हे परब यांनी सिध्द केले आहे.

दृष्टिक्षेपात...

लाल कांदा लागवडीचा प्रयोग

सलग तिसऱ्या वर्षी पाच गुंठ्यांत प्रयोग

प्रतिगुंठा ४ ते ५ क्विंटल उत्पादन

रोपनिर्मिती देखील केली स्वतःच

स्थानिक ग्राहकांकडून मोठी मागणी

एक शिखळ २५० रुपयेप्रमाणे विक्री

पाच गुंठ्यांत ५० ते ६० हजार रुपयांची उलाढाल अपेक्षित